वीर धरणात अजही निम्यापेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक.शाखा अभियंता औदुंबर महाडिक यांची माहीती
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना चिंता नाही.
नीरा : दि.२६
पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, तर सातारा जिल्यातील खंडाळा, फलटण तालुक्यातील शेतीसाठी वरादान असणाऱ्या व ०९ टीएमसी क्षमता असणाऱ्या वीर (ता. पुरंदर) धरणात आजही निम्यापक्षा जास्त म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती शाखा अभियंता . शाखा अभियंता औदुंबर महाडिक यांनी दिली आहे त्यामुळे जरी पाऊस लांबला तरी नदिकाठच्या व दोन्ही काल व्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आता चिंता नाही.
मॉन्सूनची चाहूल लागत असताना या धरणाच्या पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला असून यंदा नीरा खोऱ्यातील धरण साखळी क्षेत्रात पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे. मॉन्सून पूर्वतयारी म्हणून धरण दुरुस्ती, देखभाल, बिनतारी संदेश, धरण सुरक्षा, पूर नियंत्रण कक्ष आदी कामे पूर्ण करण्यात आली असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या नीरा नदी खोऱ्यात यंदा धरणांच्या पाण्याची परिस्थिती समाधानकारक आहे. वीर धरणात ५.४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. गुंजवणी धरणात १ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. भाटघर धरणात ५ टीएमसी पाणीसाठा आहे. नीरा देवघर धरणात २.५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता. पाऊस जास्त झाल्यामुळे धरणातून शेतीसाठी सोडण्यात येणारे रब्बी हंगामाचे आवर्तन उशिरा सोडण्यात आले होते.
चालू वर्षी (सन २०२२) धरणात पाणीसाठा समाधानकारक असून धरणातून सोडण्यात येणारे उन्हाळी आवर्तन जूनपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी संभाजी शेडगे, विजय वाल्मीक, रोहिदास धुमाळ, बाळू सोनवणे, सचिन धुमाळ, लखन भांडवलकर आदी कर्मचारी उपस्थित होते. वीर धरणात २ हजार क्यूसेक पाण्याची आवक सुरू असून धरणाच्या उजव्या कालव्यातून १ हजार ५५० क्यूसेक व डाव्या कालव्यातून ८२७ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. मॉन्सून पूर्व तयारीची कामे पूर्ण करण्याच्या या धरणाचे अस्तरीकरण, माती भराव दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. धरणाचे ९ वक्र दरवाजांची दुरुस्ती व देखभाल पूर्ण करण्यात आली आहे. धरणाच्या सुरक्षिततेची काळजी आत्तापासून घेण्यात येत असून सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहे. बिनतारी संदेश यंत्रणा, पर्जन्यमापक यंत्रणा सज्ज केली असून पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आल्याचे शाखा अभियंता औदुंबर महाडिक यांनी सांगितले.