वन्य प्राण्यांची तहान भागवून साजरा केला लग्नाचा २५ वा वाढदिवस... परिंचे येथील जाधव दांपत्याचा उपक्रम
परिंचे प्रतिनिधी दि.३१
सध्या कडक उन्हाळा सुरू असून सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.. मानव जातीबरोबरच मुक्या प्राण्यांना देखील त्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत.. हेच सामजिक भान राखून पुरंदर तालुक्यातील परिंचे गावचे रहिवासी आणि सध्या व्यवसाया निमित्त बारामती येथे स्थायिक झालेले विजय गणपत जाधव आणि सौ हेमलता
विजय जाधव यांनी आपला लग्नाचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजापुढे वेगळा आदर्श उभा केला आहे. या उभयतांनी आपल्या लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त परिंचे हरणी रस्त्यांवरील वन खात्याच्या हद्दीतील पाणवठ्यात सुमारें सहा हजार लिटरहून अधिक पाणी टँकरद्वारे सोडुन ऐन उन्हाळ्यात पशु पक्ष्यांची तहान भागवण्याचे मोठे काम केले आहे..
त्यांच्या या उपक्रमाला पेशाने शिक्षकअसणारे त्यांचे बंधू अजय व त्यांच्या पत्नी सुषमा जाधव तसेच त्यांचे मेहुणे संतोष एकनाथ जगताप यांनी हजेरी लावत मोलाचा वाटा उचलला. पावसाळा सुरू होईपर्यंत गरजेनुसार या ठिकाणी पाणी देण्याचे काम करणार असल्याचे या उभयतांनी सांगीतले.
परिंचे गावचे सामाजिक कार्यकर्ते दिवंगत गणपत यशवंत तथा ग य गुरुजी यांचे विजय जाधव हे जेष्ठ चिरंजीव आहेत तर सासवडसह पुरंदर तालुक्यात सर्वत्र सामाजिक कामात सातत्याने अग्रभागी असलेल्या स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांच्या हेमलता भगिनी आहेत. दोन्ही उभयतांनी आपल्या कुटुंबा कडून सामाजिक
कामाचा वसा अन् वारसा स्वीकारल्या बद्दल सर्वत्र त्यांचें कौतुक होत आहे.