ऊस तोड मजुरांना किराणा किटचे वाटप
स्व. प्राचार्य हनुमंतराव चाचर विकास प्रतिष्ठान, पुरंदर चा उपक्रम
नीरा दि.२१
मावडी कडेपठार गावातील एकूण २९५.५ एकर एवढे ऊस तोडणी क्षेत्र पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे स्व. प्राचार्य हनुमंतराव चाचर विकास प्रतिष्ठान, पुरंदर च्या वतीने महिला वपुरुष ऊस तोड मजुरांना किराणा किट देऊन सन्मान करण्यात आला.
श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम दि. २०/०५/२०२२ रोजी संपन्न झाला. चालू वर्षात १३,२५,३९५.४१० मे. टनाचे ऊसाचे गाळप कारखान्याने पूर्ण केले . मावडी कडेपठार गाव व परिसरातील कारखान्याकडे
नोंद असणाऱ्या २६०.३० तर बिगर नोंद असणाऱ्या ३५.२० अशा एकूण २९५.५
एकर क्षेत्रावरील ऊस तोडणी करण्यासाठी कारखान्याकडून ८ टोळ्या व १
हार्वेस्टर मशीन देण्यात आले होते. या ८ टोळ्या मधील महिला व पुरुष मजुरांच्या मदतीने मावडी गावातील २९५.५ एकरावरील ऊस तोडणी पूर्ण झाल्याची माहिती कारखान्याचे चिटबाय आनंद पाटोळे यांनी दिली.
दर वर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी उन्हाचा पारा जास्त असताना ऊस तोड मजुरांनी गेली
सहा महिने भर उन्हात काम करत मावडी गावातील ऊस तोडणीचे काम पूर्ण केले
त्याबद्दल हा सन्मान केल्याचे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष श्रीमती. जयश्री चाचर यांनी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी निवृत्त पोलीस अधिकारी,
विक्रम जगताप, सुदाम जगताप सर , पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस सत्यवान चाचर, पोलीस पाटील दादासो पांडे , राजेंद्र जगताप , सायली चाचर उपस्थित होते. या सर्व कामात कारखान्याचे चेअरमन, पुरुषोत्तम
जगताप , व्हाईस चेअरमन आनंदकुमार होळकर, मुख्य शेती अधिकारी बापूराव गायकवाड, उज्वल पवार, धनंजय खोमणे आनंद पाटोळे तसेच अधिकारी , कर्मचारी, वाहतूकदार, तोडणी मजूर, मुकादम यांचे सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाचे
आयोजन आकाश चाचर यांनी केले तसेच आभार तेजस चाचर यांनी मानले.