Type Here to Get Search Results !

माऊली पायी पालखी सोहळ्याची परंपरा आपण सर्वांनी मिळून जपुया; डॉ.अभय टिळक

 माऊली पायी पालखी सोहळ्याची परंपरा आपण  सर्वांनी मिळून जपुया; डॉ.अभय टिळक



माउलींच्या सोहळ्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनने केला पाहणी दौरा.


नीरा दि.२


नीरा :  गेली दोन वर्षे कोव्हिडमुळे ज्ञानोबारायांचा पायी पालखी सोहळा झाला नव्हता, त्यामुळे यंदाचा पालखी सोहळा अभुतपुर्व असा होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक सुविधा वारकऱ्यांना कशा मिळतील व सोहळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सामाजिक संस्था, स्थानीक प्रशासनासोबतच, जिल्हा, तालुका व लोकप्रतिनिधींचे सहकार्य अपेक्षित आहे, तसेच ज्या पध्दतीने आपण अनेक वर्ष वारीची परंपरा जपली आहे, त्याच पध्दतीने यावर्षी ही ती जपुया त्यासाठी सर्वांचे प्रयत्न करुया असे आवाहन अभय टिळक यांनी केले आहे. 


       आज दिनांक 2 एप्रिल रोजी  संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात घेतले जाणारे मुक्काम, विसावे, नीरा स्नान तसेच पालखी मार्ग यांची पाहणी प्रशासन व सोहळा प्रमुखांनी केली. यावेळी नीरा येथील पालखी तलवार  डॉ. टिळक  बोलत होते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुरंदर तालुक्यात २४ जून रोजी येत असुन २८ जूनला सातारा जिल्ह्यात जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दिवे घाट ते निरा नदीच्या तीरापर्यंतच्या पालखीतळ, रस्ते, पाणी, वीजपुरवठा, कचरा आदींची समस्या सोडविण्यासाठी पुरंदर तालुका प्रशासन व पालखी सोहळा प्रमुखांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. 


     सोमावर दि. २ मे रोजी दुपारी नीरा (ता.पुरंदर) येथील माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पुणे जिल्ह्यातील शेवटच्या विसाव्याच्या ठिकाणी पुरंदरचे आमदार संजय जगताप, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, सोहळा प्रमुख डॉ.अभय टिळक, चोपदार बाळासाहेब रणदिवे,  दौंड पुरंदरचे प्रांत प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, पुणे बांधकाम विभागाचे उपअभियंता महेंद्र पाटील,  जी.प. बांधकाम विभाग संजय गीते, शाख अभियंता प्रमोद शिंदे यांनी पाहणी केली.  यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे ,ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री काकडे उपसरपंच राजेश काकडे, सदस्य राधा  दाताजी चव्हाण,राजेश चव्हाण,कांचन निगडे, मंडलाधिकारी संदीप चव्हाण, तलाठी सुनील पाटोळे, ग्रामसेवक मनोज डेरे, आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies