पिसुर्टी येथील रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यानी केले रक्तदान
नीरा दि. २९
पिसुर्टी (ता.पुरंदर) येथे आज दिनांक २९ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्त मोरया ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले
पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. आज दिनांक २९ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर उद्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३१ मे रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले.त्याचबरोबर सायंकाळी सात वाजता भव्य मिरवणूक होणार असल्याची माहिती मोरया ग्रुपच्या वतीने देण्यात आली आहे. आज झालेल्या या रक्तदान शिबिराला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव चोरामाले पिसुर्टीचे सरपंच बरकडे, इत्यादी उपस्थित होते .
हडपसर येथील अक्षय ब्लड ब्यांकेच्यावतीने डॉ विजय पाटील , सागर लोहकरे, उत्तम पाटील, संतोष चिंचकर यांनी रक्त संकलित केले. या रक्तदान शिबिराचे आयोजन
मोरया ग्रुपच्यावतीने संस्थापक अध्यक्ष भिमाजी बरकडे ,अध्यक्ष शुभम बरकडे, उपाध्यक्ष सिद्धनाथ बरकडे,मयूर चोरमाले, लक्ष्मण बरकडे, सोनाजी काळे,बापू बरकडे, शरद बरकडे गौरव चोरमले, प्रवीण खरात, यशवंत खरात.तानाजी बरकडे, या युवकांनी केले होते. त्यांना हनुमंत बरकडे भाऊसाहेब बरकडे यांनी मार्गदर्शन केले.