वीर येथे जमावाकडून रस्ता अडवून मारहाण कार व मोटारसायकलचे ही केले नुकसान
सासवड दि.१
पुरंदर तालुक्यातील वीर येथील धुमाळ वाडी येथे २४ जणांच्या टोळक्याने दोघांना मारहाण करण्यात केली असून त्यांची मोटारसायकल व मारुती अल्टो कारचे नुकसान केले आहे.या प्रकरणी सासवड पोलिसात 24 जणांविरोधात फिर्याद देण्यात आली आसून पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 143,147,149,341,427,323,504,506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या संदर्भात मुलाचे वीर येथील रहिवाशी व सध्या सासवड येथे राहणारे अमीर बबनराव धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे.त्यानीं दिलेल्या फिर्यादी
दिनांक नुसार वीर येथील धुमाळ वाडी येथे ते दिनांक 27/05/2022 रोजी सकाळी 11:00वा.चे सुमारासशेतातून घरी येत असताना आरोपी अमोल धोंडीबा धुमाळ, 2)अक्षय पोपट रणनवरे, 3)विनोद बालासाहेब धुमाळ, 4)रविंद्र रघुनाथ धुमाळ, 5)रविंद्र तुकाराम धुमाळ, 6)अक्षय भाऊ धुमाळ, 7)दत्तात्रय विठ्ठल धुमाळ, 8)रघुनाथ भगवंत धुमाळ, 9)मोहन आप्पासाहेब धुमाळ, 10)बाळासाहेब पंढरीनाथ धुमाळ, 11)गुरूवर्य दत्तात्रय धुमाळ, 12)कुमार दत्तात्रय धुमाळ, 13)स्वप्निल रमेश भापकर, 14)मालन विठ्ठल रणनवरे, 15)सुरेखा रमेश भापकर, 16)रेश्मा विनोद धुमाळ, 17)कोमल पोपट रणनवरे, 18)अश्विनी अमोल धुमाळ, 19)कमल मोहन धुमाळ, 20)सुमन पोपटराव रणनवरे, 21)निता रविंद्र धुमाळ, 22)सुनिता दत्तात्रय धुमळ, 23)सविता रविंद्र धुमाळ, 24)विमल रघुनाथ धुमाळ, 25)मिराबाई धोंडीराम धुमाळ सर्व रा.धुमाळवाडी,वीर ता.पुरंदर जि.पुणे यांनी त्यांचा रस्ता अडवून त्यांना व त्यांच्या सोबत असलेले एक जण आणि त्यांचा भाऊ याना मारहाण केली त्याच बरोबर त्यांच्या वाहनांचे नुकसान केले. याबाबतची फिर्याद दिली असून याबाबत सासवड पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.