नीरा बारामती रस्त्यावर निंबुत येथे चार चाकी गाडीचा अपघात .
बारामती दि.२८
बारामती तालुक्यातील निंबुत देते श्याम काका काकडे यांच्या बंगल्या जवळ निरा बारामती रस्त्यावर एका महिंद्रा एस यू व्हीं कारचा अपघात झाला आहे. ही गाडी लोणंद तालुका खंडाळा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पहाटेच्या वेळी हा अपघात झाला असून या गाडीमध्ये चालकासह दोन प्रवासी असल्याचे स्थानिकांनी सांगितले असून या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटना स्थळाला वडगाव निंबाळकर पोलिस यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान या रस्त्यावरती निंबुत तसेच वाघळवाडी या भागात रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या रस्ता अरुंद असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम तातडीने पूर्ण होईल याबाबत प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.