Type Here to Get Search Results !

जाणून घ्या अविवाहित जोडापे लॉजवर एकत्र राहू शकते का? पोलिसांनी त्रास दिल्यास करा तक्रार

 जाणून घ्या अविवाहित जोडापे लॉजवर एकत्र राहू शकते का? पोलिसांनी त्रास दिल्यास करा तक्रार





पुणे दि 30



जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये असाल आणि पोलिस तुमची चौकशी करण्यासाठी आले तर घाबरण्याची गरज नाही. अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे हा गुन्हा नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये राहणाऱ्या कोणत्याही अविवाहित जोडप्याला त्रास देण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. 


              सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील राजेश बागवान याबाबत म्हणतात की, अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याचा आणि परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, यासाठी अट अशी आहे की, दोघेही प्रौढ असावेत. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे की, संविधानाच्या कलम 21 मधील मूलभूत अधिकारामध्ये स्वतःच्या इच्छेने कोणाशीही जगण्याचा आणि शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार समाविष्ट आहे. यासाठी लग्न करणे आवश्यक नाही.


याचा अर्थ असा की लग्नाशिवाय जोडपे हॉटेलमध्ये एकत्र राहत असतील तर तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. हॉटेलमध्ये राहताना पोलिसांनी अविवाहित जोडप्याचा छळ केला किंवा अटक केली, तर ते त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन मानले जाईल. पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात हे जोडपे राज्यघटनेच्या कलम २३ अन्वये थेट सर्वोच्च न्यायालय किंवा कलम २२६ अंतर्गत थेट उच्च न्यायालयात जाऊ शकतात.

             हॉटेलमध्ये राहणाऱ्या अविवाहित जोडप्याला त्रास देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध जिल्हा पोलिस अधीक्षक किंवा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडेही तक्रार करता येईल. याशिवाय पीडित जोडप्याकडे मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्याचाही पर्याय आहे. हॉटेल अविवाहित जोडप्याला विवाहित नसल्याच्या कारणावरुन थांबू शकत नाही. हॉटेलने असे केल्यास ते मुलभूत अधिकाराचे उल्लंघनही मानले जाईल. याचा अर्थ अविवाहित जोडप्यांना हॉटेलचे भाडे घेऊन आरामात राहता येते.


हॉटेलमध्ये अविवाहित जोडपे राहत असतील आणि छापेमारीच्या वेळी पोलिस त्यांच्याकडे आले, तर अशा जोडप्याने घाबरून जाण्याची गरज नाही. पोलिसांच्या मागणीनुसार, अशा जोडप्याला त्यांचे आयकार्ड म्हणजेच ओळखपत्र दाखवावे लागेल, जेणेकरून दोघेही परस्पर संमतीने हॉटेलमध्ये राहत आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या वेश्याव्यवसायात सहभागी नाहीत हे सिद्ध करता येईल.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies