नीरा परिसरातील भुरट्या चोरांचा बंदोबस्त करणार : फौजदार सुदर्शन होळकर यांची ग्वाही.
नीरा दि.२८
गेल्या आठ पंधरा दिवसात नीरा आणि परिसरात दोन वेळा भुरट्या चोरीचे प्रकार घडले आहेत.त्यामूळे लोकांच्या दुकानाचे नुकसान झाले आहे.मात्र अशा चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी नीरा दूरक्षेत्राचे फौजदार आणि इतर कर्मचारी पुढे सरसावले आहेत.
नीरा दुरर्क्षेत्राच्यावतीने परिसरातील चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यास पोलिसांना यश आले होते.यासाठी पोलिसांनी विविध उपाय योजना राबवल्या होत्या..स्थानिक चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.त्याच बरोबर स्थानिक तरुणांना बरोबर घेऊन चोरी होऊच नये यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न शिल होती.त्याच बरोबर पोलिसांनी रात्र गस्त वाढवली होती. मात्र १५ दिवसात दोनदा दुकाने फोडीच्या घटना घडल्याने आता नीरा दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी सुदर्शन होळकर यांनी या चोरांचा बंदोबस्त करणार असल्याचे म्हटले आहे.आज दिनांक २८ मे रोजी ते माध्यमांशी बोलत होते. वाढत्याा भुरट्या चोरांना संदर्भात प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. यावेळी त्यांनी लवकरच अशा चोरांचा बंदोबस्त केला जाईल अस म्हटलंय .