Type Here to Get Search Results !

सैरभैर टोळीच्या प्रमुखावर मानसोपचाराची गरज; प्रशांत जगताप

 सैरभैर टोळीच्या प्रमुखावर मानसोपचाराची गरज; प्रशांत जगताप



पुणे दि.२७



    राज्यात महा विकास आघाडीची सत्ता आल्यापासून राज्यातील भाजप नेते सैरभैर झाले आहेत. तर त्या सर्व टोळीचा प्रमुख असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यातूनच ते काहीही बेताल वक्तव्य करीत सुटले आहेत.' ना घर का ना घाट का' अशी अवस्था झालेल्या आणि मानसिक स्वास्थ्य बिघाडलेल्या व्यक्तींनी असे सार्वजनिक जीवनात वावरणे धोकेदायक आहे. त्यामुळे त्यांनी घरी जावे घरातील माय माऊली स्वयंपाक करून त्यांची वाट पाहत असेल दोन घास खावे. आणि मानसिक आजारावर उपचार करून आराम करावा.असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.


     चंद्रकांत पाटील यांची जीभ पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांच्या वर घसली होती. मासानात जा असा शब्द त्यांच्या तोंडातून निघाला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावर बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना बेताल वक्तव्य करून पुन्हा एकदा मानसिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे. त्यांच्या वक्तव्यातून समस्त महिलावर्ग बाबत पाटील व ते ज्या मुशीत घडले आहेत त्या मात्र संस्थेची काय मानसिक आहे हे दिसून येते आहे. महिला भगिनींना केवळ चूल व मूल यापुरतेच मर्यादित ठेवण्याच्या या मानसिकतेतून बाहेर येऊन पाटील यांनी सध्या महिला कोणत्या क्षेत्रात किती प्रगती करत आहेत हे पाहण्याची गरज आहे.आस त्यांनी म्हटले आहे.


      महिला सबलीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी करू नये. सुप्रियाताई यांना घरी बसवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत त्यांनी किती जंग पछाडले आहे आणि आत्तापर्यंत किती वेळा तोंडावर आपटले आहेत ते महाराष्ट्र ने बघितले आहे. एकदा राज्यसभा आणि तीन वेळा लोकसभेत निवडून आलेल्या सुप्रियाताईंचा संसदेतील आणि राजकारणातील अनुभव काय आहे. हे महाराष्ट्रातील जनता जाणून आहे. प्रत्येक स्त्रीला कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्याची आणि त्याचबरोबर आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची जन्मजात देणगी मिळाली आहे. सुप्रिया सुळे या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडतात हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहित आहे. परंतु चंद्रकांत पाटील यांनी सुप्रियाताईंना महिला म्हणून जरी घरी जाऊन स्वयंपाक करा नाहीतर मग. ....,जा असे म्हणून समस्त महिलावर्गाचा जो अपमान केला आहे. त्याचे उत्तर त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. सुप्रियाताई यांनी मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी मध्य प्रदेशात मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन कोणाची भेट घेतली होती? इतका साधा प्रश्न उपस्थित केला. जर भाजपने त्यांच्या कृतीमध्ये काही काळेबेरे नव्हते तर या प्रश्नावर सरळ उत्तर देता आले असते. परंतु सुप्रियाताईंनी नेमके वर्मावर बोट ठेवण्याचा परिणाम पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडन्यात झाला असावा. अशी शक्यता नाकारता येत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies