Type Here to Get Search Results !

नीरा येथे पुण्यशलोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती करण्यात आली साजरी

 नीरा येथे पुण्यशलोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती करण्यात आली साजरी



 नीरा दि.३१


         नीरा (ता.पुरंदर ) येथे आज दिनांक ३१ मे रोजी पुण्यश्लोक आहील्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त नीरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

     नीरा ता.पुरंदर येथे आज सकाळी १० वाजळेच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती गोरखनाथ माने,,नीरेचे उपसरपंच राजेश काकडे,ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, संदीप धायगुडे राधा माने, अभिजित भालेराव,सोमेश्वर कारखान्याचे माजी व्हॉईस चेअरमन वसंत दगडे,माजी उपसरपंच दीपक काकडे,गणेश गडदरे, बाबुराव दगडे,गणपत लकडे,महेश धायगुडे,तात्या लकडे,संदीप जावळे, मच्छिंद्र लकडे,सुनील धायगुडे, भैय्या दगडे आणील दगडे, ग्रामसेवक मनोज ढेरे,पोलीस पाटील राजेंद्र भास्कर पोलीस कर्मचारी संदीप मोकाशी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.



  यावेळी नीरेचे उपसरपंच राजेश काकडे यांनी आहील्याबाईनी देशात केलेल्या विविध कामाची माहिती दिली.अगदी जेजुरी येथे यात्रेकरू साठी बांधलेला तलाव आणि नीरा नजीक थोपटेवाडी येथे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेली विहीर आजही उपयोगात येत आहे. असे ते म्हणाले.यावेळी डॉ.वरांत दगडे यांनी शुद्घा मनोगत व्यक्त केली ते गणेश गडदरे यांनी आभार मानले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies