कडक उन्हाळ्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने वाल्हे पालखी मैदानातील झाडांना तारले. आठवड्यातून एक दिवस दोन टॅंकरच्या माध्यमातून पालखी मैदानातील झाडांना मुबलक प्रमाणात मिळतेय पाणी.
वाल्हे (दि.२६) श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचे मुक्कामी ठिकाण असलेल्या, वाल्हे (ता.पुरंदर) येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुर्वी मुक्कामाचे ठिकाणी जागा कमी पडू लागल्याने, मागील काही वर्षांपासून सुकलवाडी फाट्यानजीक (ता.पुरंदर) असलेल्या ओसाड माळरानावर पालखी सोहळा मुक्कामाचे ठिकाण करण्यात आले असून, शासकीय मालकीचा असलेल्या भव्य पालखी तळ मागील पाच- सहा वर्षांपासून, पालखीतळ सुशोभीकरणातुन, भव्य पालखी मैदानास सीमा भिंत , दोन स्वागत कमाण, हायमास्ट दिवे, पालखी विसावा ओटा आदी कामे शासनाच्या माध्यमातून करण्यात आली होती.
मात्र, संपुर्ण माळरान असल्याने, या माळावर पावसाळा संपल्यानंतर फक्त वाळलेले गवत होते. या भव्य पालखी मैदान परिसरात विविध संस्था, तसेच 'हरितवारी उपक्रमांतर्गत' आळंदी देवस्थान, सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या देवराई संस्था, बाणेर येथील वसुंधरा अभियान, तसेच प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे सर मिञ परिवार, वाल्हे ग्रामपंचायत , सुकलवाडी ग्रामपंचायत, वृक्षसंवर्धन गृप वाल्हे, विविध पक्षातील नेते, तसेच स्थानिक युवक, यांच्या वतीने येथील पालखी मैदानामध्ये , जवळपास ४०० - ४५० विविध प्रकारची झाडे पालखी तळ हरित करण्यासाठी वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब, नादुरकी, जांभूळ, करंज, आपटा, गुलमोहर आदी प्रकारची झाडे मोठ्याप्रमाणावर लावण्यात आली असून, त्या झाडांची निगा राखने गरजेचे असताना मात्र याकडे, अनेक नेते, विविध संस्था दुर्लक्ष करीत आहेत.
वृक्षारोपण केलेले सर्वच झाडांची निगा वृक्षसंवर्धन ग्रृपचे सदस्य, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे सर मिञ परिवार चांगल्या प्रकारे करीत असून, वाल्हे, सुकलवाडी ग्रामपंचायत व प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखाली वृक्ष संवर्धन ग्रुपच्या सदस्यांनी पालखी तळावरती लावलेल्या वृक्षांचे एक प्रकारे पालकत्व स्वीकारून त्यांचे जतन व संवर्धन केले आहे.
मागील दोन वर्षांपासून, पावसाळा संपल्यानंतर झाडांचे संगोपन करताना या झाडांना पाण्याची अडचण निर्माण झाली होती. यावरही प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या माध्यमातून, तसेच वाल्हे ग्रामपंचाय, सुकलवाडी ग्रामपंचायत, व श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी तोडगा काढून, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने दर गुरूवारी दोन टँकरच्या माध्यमातून, या झाडांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्वीकारली होती.
ट्रस्ट कडून पाण्यासाठी दोन टॅंकर मागील दीड- दोन वर्षांपासून, उपलब्ध करून देण्यात आले असल्याने, वाल्हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी, व वृक्षसंवर्धन गृपचे सदस्य, अमोल दुर्गाडे, महेश भुजबळ, सागर दुर्गाडे, महेंद्र भुजबळ, पवण दुर्गाडे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गंगावणे, मोतीराम भोसले तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे टँकर चालक सुरेश पवार, प्रविण शिंदे आदी पालखी मैदानामधील झाडांना पाणी देत आहोत. त्यामुळे येथील झाडे चांगल्या प्रकारे वाढत असून, मागील अनेक वर्षांपासून, उन्हाळ्यात ओसाड दिसत असलेल्या माळावरती कडक उन्हाळ्यातही हिरवीगार झाडे आनंदाने डोलताना पाहून समाधान वाटत आहे. भविष्यात या ओसाड माळरान अजून दाट हिरवाईने नटलेले दिसेल.