लोकांचे आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर पिण्यासाठी शुद्ध पाणी असायला.हवे ; प्रकाश शिंदे
नीरा दि.४
बहुतांश आजार हे अशुद्ध पणी पिल्या मुळे होत असतात.त्यामुळे लोकांचे लोकांचे आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर पिण्यासाठी शुद्ध पाणी असायला हवे . त्यामुळेच आम्ही ग्रामपंचायतीत सत्तेवर आल्याबरोबर पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी आरो प्लांट बसवला आहे लोकांनी त्याचा चांगला वापर. करावा आहे आवाहन पिंगोरीचे उपसरपंच प्रकाश शिंदे यांनी केले आहे.
पिंगोरी (पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आरो प्लांट बसवण्यात आला आहे. या आरो प्लांटचा शुभारंभ दि.3 रोजी पिंगोरी ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपसरपंच प्रकाश शिंदे बोलत होते.यावेळी. सरपंच जीवन शिंदे, सदस्य संदीप यादव ,भाग्यश्री शिंदे, ज्योती शिंदे,शुषमा.भोसले, पोलीस पाटील राहुल.शिंदे, माजी सरपंच पल्लवी भोसले,निलेश शिंदे सचिन शिंदे , हरिश्चंद्र यादव, महेश शिंदे अक्षय चव्हाण शंकर शिंदे,अनिल भोसले,राजेंद्र गायकवाड ,रुपेश यादव संतोष शिंदे अरुण शिंदे,प्रवीण गायकवाड, संपत शिंदे,पोपट शिंदे,बाळासाहेब सुतार आदींसह मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच प्रकाश शिंदे यांनी शुद्ध पाणी आरोग्याला किती फायदेशीर आहे व त्यामुळे कोणते आजार आपण दूरच रोखू शकतो. याबाबतची माहिती दिली.यावेळी सरपंच जीवन शिंदे म्हणाले की,१३ व्या वित्त आयोगातून हा प्लांट आपण बसवला आहे.मध्यत्रीच्या काळात आपण ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने आपली बरीच कामे रखडली होती पण आता आपण ती तातडीने पूर्ण करीत आहोत.