सासवड जेजुरी मध्ये महामार्गावर वाहतूक कोंडी वाहनचालक त्रस्त
नीरा दि.८
पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी या शहरांमध्ये दुपार पासून प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.जेजुरी येथे मोठ्या प्रमाणात भाविक देव दर्शनाला आल्याने शहरातही वतुक कोंडी पाहायला मिळाली.
पुरंदर तालुक्यात दर रविवारी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.त्यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुरंदर मधून जाणारा पुणे पंढरपूर मार्ग हा वर्दळीचा मार्ग आहे.त्यामुळे या मार्गावरून नेहमीच गर्दी असते.मात्र आता दर रविवारी तालुक्यातील जेजुरी,नारायणपूर, केतकावळे,वीर या प्रमुख देवस्थानाच्या ठिकाणी शहरातील लोक धार्मिक पर्यटनासाठी येत आहेत.दिवसेंदिवस ही गर्दी वाढती आहे.त्यातच जेजुरी येथे गावातून जाणारा महामार्ग अरुंद आहे.त्यामुळे मुख्य छत्रपती शिवाजी चौकात वाहतूक कोंडी होते. जेजुरीत येणाऱ्या लोकांन व्यतिरिक्त वाहनासाठी बाह्यवळण रस्त्याची मागणी आता लोकांकडून होत आहे. मात्र गेली अनेक वर्ष या रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे येथी लोकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तर सासावड मध्ये ही रस्ता अरुंद असल्याने व नारायणपूर, वीर, केतकावळे या ठिकाणी जाण्यासाठी लोक येत असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सासवड मध्ये आज सायंकाळी चार नंतर वाहतूक कोंडी झाली होती.
पाणी व्यावसायिकांमुळे जेजुरी शहरात कोंडी.
जेजुरीत आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती.त्यामुळे हॉटेल मधून पाण्याची मागणी वाढली होती.बहुतेक अंतर्गत सर्व रस्त्यांवर पाणी पुरवठा करणारी वाहने विरुद्ध दिशेला उभी करण्यात आली होती.त्यामुळे अंतर्गत भागात हॉटेल किंवा दुकानांन समोर वाहतूक कोंडी होत होती.पोलीस प्रशासन प्रमुख रस्त्यावरच अडकल्याने अंतर्गत भागात बेशिस्त पार्किंग होऊन वाहतूक कोंडी होत होती.