अखेर त्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल
सासवड दि.३०
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका वाईनच्या दुकानासमोर दिनांक चोवीस मे रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. असे पोलिसांकडून सांगितलं जात होतं. मात्र या नंतर आता या प्रकरणी नवीन माहिती उजेडात आल्याने या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे, अर्थात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर याच मारहाणीत जखमी झालेला आणि उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला प्रकरणी सुद्धा कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसापासून हा खुनाचा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या राजकीय नेत्याची मोठी गोची झाल्याचे दिसते आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका दारूच्या दुकाना समोर तीन व्यक्तींना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्यांच्यावर उकळते तेल टाकल्याची व जबर मारहाण केल्याची चर्चा सासवड शहरामध्ये रंगली होती. त्याच बरोबर या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाल्याचे व एका महिलेचा हात मोडल्याची चर्चासुद्धा रंगली होती. मात्र पोलिसांनी हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा शवविच्छेदन अहवाल आल्याचे सांगितल्याने याबाबत लोकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र याबाबत आज दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी सासवड पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आला आहे.
हा खुनाचा प्रकार असल्या संदर्भातची बातमी 'न्यूज मराठी डॉट कॉम' ने काल प्रसिद्ध केली होती. यानंतर सर्व पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. सासवड मधील काही संघटनांनी याबाबत आंदोलनाची सुद्धा तयारी केली होती. यानंतर आज सायंकाळी उशिरा सासवड पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २४ मे रोजी तीन व्यक्तींना ही मारहाण करण्यात आली होती. यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर एका व्यक्तीला पोलिसांनी ससून येथे उपचारासाठी पाठवलं होतं. तर एका महिलेचा हात मोडल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते. या महिलेला सुद्धा आज दिवसभरात पोलिसांनी शोधून काढले आहे. तर ससून मध्ये उपचारासाठी पाठवलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सासवड पोलिसात यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश दिले होते. या आदेशानुसार आज दोन व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी यासानाड येथील पप्पू उर्फ निलेश जगताप यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आजी-माजी आमदारांच्या जवळच्या व्यक्तींची सासवड पोलीस स्टेशन मध्ये जास्तीची ढवळाढवळ
पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस स्टेशन मध्ये माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांचे जवळचे समजले जाणारे कार्यकर्ते पोलिसांच्या कामात सतत ढवळाढवळ करता आढळून येतात. त्यांच्याकडून हा खुनाचा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे सासवड शहरात आता बोलले जात आहे. दोन दिवस हा कार्यकर्ता यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तळ ठोकून होता. शवविच्छेदनाचा अहवाल मनासारखा येईपर्यंत ते पोलिसांनी नैसर्गिक मृत्यू आहे असे म्हणे पर्यंत प्रचंड असा दबाव पोलिस यंत्रणेवर या कार्यकर्त्यांकडून आणला जात होता. त्यामुळे पोलीस यंत्रणेला काम करणे अशक्य होऊन बसले आहे. पुरंदर तालुक्यात सध्या दबावाचे राजकारण सुरू असून पोलिस यंत्रणा आणि जनता यामध्ये भरडली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी व राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी याबाबत लक्ष घालून जनतेला योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
या अशा व्यक्तीनंमुळे तालुक्यात लँड माफियांची मोठी टोळी मस्तवाल झाले असून लोकांना अनेक जमिनी विकण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे अनेक पुरंदरकर आपल्या जमिनी विकून भूमिहीन होत आहेत.
या बाबत पोलीस उप निरीक्षक सुनील चिखले यांनी फिर्याद दिली असून आरोपी निलेश उर्फ जयवंत जगताप यांचे विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२ व ३२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशी मध्ये निलेश उर्फ पप्पू जगताप याने दिनांक २३ मे रोजी तेथे कट्ट्यावर बसणारे लोक उठत नव्हते म्हणून त्यांना मारहाण केली.यामध्ये अंदाजे ६० वर्षीय व्यक्ती दुसरा ५० वर्षीय पुरुष,व सासावड येथे राहणाऱ्या व मासे विक्री करणाऱ्या ६० वर्षी शेवंताबाई जाधव यांना काठीने मारहाण केली.यानंतर ते तिघेही तिथेच पडून होते .तेव्हा जगताप याने उकळते पाणी त्या तील एकाच्या आंगावर ओतले. त्यानंतर दिनांक २४ मे रोजी सुध्धा आरोपीने त्या व्यक्तीला पुन्हा बेदम मारहाण केली. अशा प्रकारची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.