बारामतीतील सुपे येथील धक्कादायक घटना !!! दुकानाचा बोर्ड डोक्यात पडल्याने महिलेचा मृत्यु
बारामती. दि.२२
बारामती तालुक्यातील सुपे येथे एका महिलेच्या डोक्यामध्ये दुकानाचा बोर्ड पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे . मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही महिला कुतवळवाडी येथील रहिवासी आहे.
त्या कामानिमित्त बाहेर निघाले असता सुपे येथील एका दुकानाजवळ कुटुंबातील व्यक्तीची वाट पाहत होत्या.
त्या ज्या इमारती जवळ उभ्या होत्या ती इमारत तीन मजली होती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून एका दुकानाच्या नावाचा टांगलेला बोर्ड वाऱ्या मुळे खाली पडला.
तो बोर्ड थेट सदरील महिलेच्या डोक्यात पडला व तिला जबर जखम झाली त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले .या घटनेमुळे सुपे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.