जेऊरग्राम सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर धुमाळ, उपाध्यक्षपदी रत्नकांत तांबे बिनविरोध.
वाल्हे (दि.२६) जेऊर (ता. पुरंदर) येथील जेऊरग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर भिकोबा धुमाळ व उपाध्यक्षपदी रत्नकांत साधू तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान, जेऊरग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक शनिवार (दि. २३ एप्रिल ) अटीतटीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा तेरा शून्य असा धुरळा उडवत सोसायटी ताब्यातील ठेवण्यात यश मिळवत विजयाचा गुलाल उधळला होता.
सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनेलने भैरवनाथ-जयमल्हार विकास परिवर्तन पॅनेलचा तेरा-शून्य असा धुरळा उडवत सोसायटीवर निर्विवाद सत्ता कायम राखली. दोन्ही पॅनेलमधील घमाशान लढाईनंतर सत्ताधारी श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनेलने स्वत:च्या ताब्यातील सोसायटी ताब्यात ठेवण्यात यश मिळविले.
दरम्यान, सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन एक महिना उलटल्यानंतर बुधवार (दि.२५) जेऊर येथील, जेऊरग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी ए. एस. बागवान यांच्या देखरेखेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी मनोहर धुमाळ यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी रत्नकांत तांबे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने या दोघांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.
यावेळी लक्ष्मण बडदरे, बाळू धुमाळ, दीपक धुमाळ, दत्तात्रेय धुमाळ, दिगंबर धुमाळ, अनिल गार्डी, संजय गायकवाड, बापूराव गायकवाड, गजानन देशपांडे, शुभांगी धुमाळ व वंदना चोरगे, बाळासाहेब धुमाळ, प्रकाश बडदरे, संतोष चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव धुमाळ यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
माजी उपसरपंच दत्तात्रेय धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. जेऊरचे माजी सरपंच प्रतीक धुमाळ यांनी आभार मानले.