भरधाव टँकरच्या धडकेत महिला जागीच ठार तर एक जण जखमी
टँकरचालक घटनास्थळावरून पसार
बारामती दि.२६
बारामती शहरातील रस्त्यांवर ढवन चौकापासून काही अंतरावर एका टँकर आणि दुचाकीचा अपघात होऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना दिनांक २५ रोजी रात्री घडली आहे. मुलाच्या लग्नाची बोलणी करण्याकरता निघालेल्या पती पत्नी यांच्या दुचाकीला अपघात झाला .यामध्ये भरधाव वेगाने एका टँकरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली आहे. या घटनेत भरधाव आलेल्या टँकर खाली दुचाकीवरील महिला सापडल्याने तिच्या डोक्यावरून चाक गेले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर टँकर ड्रायव्हरने कोणतीही मदत न करता टँकर घेऊन तो भरधाव वेगाने कारभारी सर्कलच्या बाजूने पळून गेला.
घटनेनंतर काही काळासाठी बारामतील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेचा पुढील तपास बारामती शहर पोलिस करत आहेत.