नीरा येथील कीर्तन मोहत्सवाची सांगता
कोविड योध्यांचा करण्यात आला सन्मान
नीरा दि.२३
नीरा ता.पुरंदर येथे सुरू असलेल्या किर्तन मोहत्सावाची आज दुपारी सांगता करण्यात आली सांगता. नीरा येथील सुभाष महाराज जाधव यांच्या काल्याच्या कीर्तनाने व कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या विविध व्यक्ती व संस्थांचा यावेळी ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला.
नीरा येथे दरवर्षी कीर्तन मोहत्सवाचे आयोजन श्री ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव समिती ट्रस्टच्यावतीने केले जाते. यावर्षी दिनांक १७/५/२०२२ ते आज सोमवार दिनांक २३ /५/२०२२ पर्यंत हा महोत्सव पारपडला.आज कल्याचे कीर्तन झाल्यानंतर ट्रस्टच्यावतीने कोरोना काळात निर्भिडपणे पुढे होत कर्तव्य बजावणाऱ्या विविध मान्यवर व संघटनांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ग्रामपंचायत नीरा,प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा, पोलीस दुरर्क्षेत्र नीरा, डॉक्टर असोशियशन नीरा, नीरा शहर पत्रकार संघ.आणि आशा स्वयंसेविका याचा सन्मान करण्यात आला.यावेळी पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता (आबा) चव्हाण,उपसरपंच राजेश काकडे, अनिल चव्हाण, प्रभूदयाल अग्रवाल, चंदरकाका धायगुडे, अशोक पोकळे, सुभाष पवार, विठ्ठलराव गजाकोश, नंदकुमार महामुनी, उत्तमराव घुले पाटील, अशोक पोकळे, मदननाना चव्हाण, विक्रम पवार, विलास धायगुडे, निरा दुर्क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कुंडलिक गावडे, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.