शिवतक्रार सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी लकडे तर व्हा चेअरमनपदी कल्याणराव जेधे यांची बिनविरोध निवड
नीरा दि.२१
पुरंदर तालुक्यातील निरा शिवतक्रार येथील शिवतक्रार विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदासाठीची निवडणूक आज दिनांक २१ मे रोजी पारपडली यामध्ये चेअरमन पदासाठी शिवाजी लकडे यांचा तर व्हाईस चेअरमनपदासाठी कल्याण जेधे यांचा एकमेव अर्ज आल्याने या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती बागवान यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
शिवतक्रार येथील सोसायटीची निवडणूक नेहमीच बिनविरोध होत असते. यावर्षी ही निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज बांधला जात होता. मात्र पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण आणि ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रराव धायगुडे यांच्या पुढाकाराने संचालक पदाची निवडणूक पंधरा दिवसापूर्वी बिनविरोध पारपडली. या दोन्ही ज्येष्ठांनी सर्व पक्षाच्या उमेदवारांना एकत्र केले.आणि सोसायटीची मोट बांधण्यात या दोघांच्या त्यांना यश आले. यामध्ये संचालक म्हणून नामदेव कृष्ण धायगुडे, कल्याण राजाराम जेथे, बबनराव जयसिंग लकडे, बाबुराव आनंदराव दगडे, संपत रामभाऊ पोकळे, जगन्नाथ भाऊसो लकडे, सुरेंद्र भालचंद्र जेधे, संतोष रामचंद्र ताकवले, सुजाता रवींद्र जेधे, दैवशीला भूषण वळकुंदे, शिवाजीराव मारुती लकडे, रशीदभाई बबनभाई सय्यद, बाळासाहेब रामचंद्र भोसले यांची बिनविरोध संचालक म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर आज दिनांक २१ मे रोजी निरा येथील कार्यालयात झालेल्या निवडणुकीत. शिवाजी लकडे यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली तर व्हा चेअरमनपदी कल्याणराव जेधे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक बाळासाहेब भोसले यांनी या दोघांना अनुमोदन केले होते. या निवडीनंतर निरा ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल चव्हाण यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.