भिगवण येथे महाविद्यालयीन तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
भिगवण : प्रतिनिधी
भिगवण (ता. इंदापूर) येथे २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.३०) रात्री११ वजलेच्या सुमारास घडली आहे.
स्वामी चिचोली (ता.दौंड) येथे दत्तकला विद्यालयात शिक्षण घेत असलेला ऋषीकेश हरीविजय चव्हाण (वय २१, रा.सुस्ते ता पंढरपूर) असे या युवकाचे नाव असून आत्महत्या नेमकी कशामुळे केली याचा तपास पोलीस करत आहेत.
पुणे- सोलापूर महामार्गालगत भिगवण येथील यश हाईट्स इमारतीतील फ्लॅट नं. सी ५ मधील बेडरूममध्ये गळफास घेवुन या युवकाने आत्महत्या केल्याची माहिती इमारतीत राहणार्या नागरीकांकडून पोलिसांना मिळाली. याबाबतचा पुढील तपास भिगवण पोलीस स्टेशनचे हवालदार करे करत आहेत.