नीरेच्या बाजारपेठेत पोलीसांना गचंडत केली शिविगाळ.
ऊस तोडणी कामगार व पोलीसांत तु तु मै मै
निरेत भरपेठेत ऊसतोड मजूरांनी खाकी वर्दीवर उचललं हात.
वाहतूकही आडवली
नीरा : १७
ऊस तोडणी हंगाम शेवटच्या टप्पयात असताना आज नीरा परिसरातील शेवटची खेप टाकताना डी.जे सह मिरवणूक काढली. पण नीरा शहरात ट्राफीक जाम झाल्यानंतर पोलीसांनी हटकले असता ऊस तोडणी कामगारांची व पोलीसांची तु. तु. मै.मै झाली नंतर अक्षरशः पोलीसांवर आरेरावी करत मद्याधूद कामगारांनी दहशत माजवली. पोलीस शिपायांना अक्षरशः गचांडत मागे सारले. तसचे जमावाने शिविगळ केली. हे सर्व नागरीकांच्या मोबाईल.कँमेरात कैद झाले.
दर वर्षी एप्रिल मध्ये संपणार ऊस गळीत हंगाम या वर्षी मे महिण्याच्या १५ तारखेनंतरही सुर होता. आज नीरा परिसरातील हरणी, जेऊर, मांडकी, पिसुर्टी, पिंपरे (खुर्द) येथील ऊस तोडणी करणारे वाहतूकदार मजूर व ट्रँक्टर चालक यांनी आधी अरुंद पालखी मार्गावर व नंतर नीरा ग्रामपंचायत कार्यालय ते बुवासाहेब चौक दरम्यान डि.जे. सह मिरवणूक काढली. यावेळी ऊस तोडणी मजूर मोठ्य प्रमाणावर मद्याधूंद होते. ही मिरवणूक ऐन सायंकाळी निघाल्याने नीरा शहरात ट्राफिक जाम झाले. पालखी मार्गावरतर दोन किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग लागली होती. नीरेच्या मुख्य बाजारपेठेत या मद्याधुंद कामगारांनी अक्षरशः धुडगुस घातला.
नीरा शहरात ट्राफिक जाम झाल्याचे नीरा पोलीसांना कळताच पोलीस हवलदार संदिप मोकाशी, निलेश करे, निलेश जाधव यांनी ट्राफिक मोकळे करण्याच्या उद्देशाने कारवाई करण्यास सुरवात केली. आधी डि.जे वाल्याला पिटाळण्यात आले. तरही ट्राक्टर चालक व मजुर अडलट्टु पणा करत ट्रँक्कटरवरील साऊंड लावत भर बाजारपेठेत रस्ता आडवून नाचत होते. पोलीसांशी त्यांना समजवत पुढे येण्याची हात जोडून विनंती केली पण ते ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हते. त्यातीलच एक मद्याधुंद युवकाने पोलीस शिपायांची कॉलर धरत अक्षरशः गचांडत जमावात शिविगाळ केली. हे सर्व द्रुष्य काही ग्रामस्थांनी मोबाईल मध्ये चित्रीत ही केली.
नीरेतील पोलीस शिपायांना गचांडल्याची माहिती नीरा पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांना समजताच शासकी गाडी घेऊन ते ही बुवासाहेब चौकात दाखल झाले. परिस्थीती पाहता गोतपागर यांनी शब्दांचा मारा करत या सर्वांना पिटाळले. पण खाकी वर्दिवर टाकलेला हात किती महागात पडतो ही पाहणे आत औत्सुक्याचे झाल्याचे नीरा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून बोलले जात आहे.