चंदननगर येथे धमकी देऊन शाळकरी मुलीवर बलात्कार.
पुणे दि.२८
पुण्यातील चंदननगर येथे एका शाळकरी मुलीला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यातील चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका शाळकरी मुलीला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही पीडित मुलगी गर्भवती राहिली असल्याने हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
विशाल पिराजी शिखरे अस अटक करण्यात आलेल्या वीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो खराडी परिसरातील रहिवासी आहे. हा आरोपी ओळखीचा असून पिडीतेच्या घरी त्याच येणे जाणे होतं. आरोपीने ओळखीतून या पिडीत मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. तसेच या प्रकारची कुणाला माहिती दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी या पिडीत मुलीला दिली. या पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे. यानंतर या मुलीच्या आईने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याचा तपास पोलीस निरीक्षक मुळुक करत आहेत.