केंद्र सरकारची आणखी एक महागाईची भेट.
घरगुती गॅस सिलेंडरचा दर वाढला
नवी दिल्ली. दि.७
वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला केंद्र सरकारने आज आणखी एक भेट दिली आहे
घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा एकदा महागला आहे.त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशा रिकामा होणार आहे. सरकारने १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे.
आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत ९९९.५० रुपये असणार आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनता हैराण असतानाच सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे. एलपीजीच्या दरवाढीमुळे भारतातील सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडणार आहे.
इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. त्यात आता गॅस महागला आहे. याआधी व्यावसायिक सिलिंडर महाग झाला होता. याआधी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती १०२ रुपयांनी वाढल्या होत्या. एप्रिल महिन्यात या किंमतीमध्ये २६८ रुपयांनी वाढ झाली होती. त्यात पुन्हा मे महिन्याच्या सुरुवातीला त्यात वाढ झाली होती. एकीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढल्या असताना आता घरगुती सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडले आहे.
या मे महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आली होत्या. १ मे रोजी, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १०२.५० रुपयांनी वाढून ती २३५५.५० रुपये झाली. तसेच, ५ किलोच्या एलपीजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत ६५५ रुपये करण्यात आली आहे. तर आता घरगुती वापराचा सिलेंडर ९९९.५० रुपयाला घ्यावा लागणार आहे.