नीरा येथे ट्रक टँकरचा अपघात ; दोनजण गंभीर जखमी
नीरा : दि.१२
पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील अपघातांचे सत्र काही केल्या थांबेनात. नीरा नदिच्या पुलाच्य काठावरील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसाव्या समोर ट्रक टँकर मध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहे. जखमी ंना खाजगी रुगणालयात दाखल केले असुन, घटनास्थळी नीरा पोलीस दाखल झाले आहेत.
प्रत्यक्ष दर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार लोणंद बाजूकडून मोकळा टँकर क्रमांक एम.एच - १७- बी.वाय - ३५७५ नीरा येथील कंपनीकडे चालला होता. तर पुणे बाजूकडुन कोल्हापुरकडे मालवाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम.एच - ०९ - सी.ए - १३९७ भरधाव वेगाने निघाला होता. नीरा नदिच्या पुला शेजारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व नगर बायपास एकत्रीत येतो. त्या ठिकाणी लोणंद बाजुकडून येणारा टँकर पालखी मार्गावरून नगर बायपास कडे वळत होता. त्याचवेळी पुणे बाजूकडून भरधाव येणाऱ्या मालवाहतूकीच्या ट्रकने मोकळ्या टँकरला समोरासमोर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की त्या आवाजाने परिसरातील नागरीक घरा बाहेर आले.
मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने मोकळ्या टँकरला दिल्या जोरदार धडकेने टँकरची दिशाच बदलली. त्यामुळे दोनही वाहने नक्की कुठे चालली होती हे सुरवातीला कळतच नव्हते. पण टँकरच्या मागे दुचाकीवर असलेल्या युवकांनी हा अपघात प्रत्यक्ष पाहिल्याने त्यांनी माध्यम प्रतिनिधींना तातकाळ फोन करुन ही माहिती दिली. अपघात स्थळी नीरा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, सुदर्शन होळकर, निलेश जाधव तातकाळ दाखल झाले होते.
पुढील महिन्यात याच धोकेदायक मार्गवरुन लाखोंच्या वैश्नवांचामेळा घेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जाणार आहे. पालखी सोहळा एका महिन्यावर येऊन ठेपला असतांनाच अपघांचे सत्र काही केल्या थांबेना किंवा कमी ही होईनात. गेली वीस वर्ष जेजुरी ते नीरा दरम्याचा पालखी मार्गाचे एक इंच ही रुंदिकरण झाले नाही वाहनांची संख्या व वेग कैक पटीने वाढला. त्यामुळ या भागात अपघातांचे प्रमाण वाढलज आहे.