राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार 2022 जाहीर
संपादक श्रीराम पवार , लेखक इंद्रजीत सावंत, अभिनेते निखिल चव्हाण ठरले पुरस्काराचे मानकरी
जेजुरी प्रतिनिधी दि.७ न्युज मराठी डॉटकॉम
मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मनाचा राज्यस्तरीय “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार २०२२” पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दैनिक सकाळचे संपादक श्रीराम पवार, साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल इंद्रजीत सावंत आणि सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल सिनेअभिनेते निखिल चव्हाण यांस जाहीर करण्यात आलेला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळ्यानिमित्त शनिवार दिनांक १४ मे २०२२ ला पुरंदर किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात खा. युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले ,खा.सौ.सुप्रिया सुळे, राज्यमंत्री विश्वजित कदम, आ. रोहित पवार, आ.संजय जगताप , मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे, विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असते, आजवर दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते अमोल कोल्हे , अभिनेते भरत जाधव, अभिनेते अंकुश चौधरी अभिनेते अशोक समर्थ , संपादक चंद्रकांत पाटील, संपादक तुळशीदास भोईटे, संपादक निलेश खरे, संपादक अजित चौहान, सुहास खामकर, लेखक सुशील धसकटे, शरद तांदळे यांना सुद्धा “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले आहे.
तसेच यावेळी श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी, अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा टीम, युवा उद्योजक रामदास गवते, प्रगतशील शेतकरी नवनाथ धोत्रे, मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त संदिप जगताप, नीतिकुशलचे संस्थापक प्रवीण निकम यांचा सुद्धा यावेळी विशेष सन्मान केला जाणार असल्याची माहिती
सोहळ्याचे आयोजक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी दिली , या वेळी सागर जगताप , संदीप जगताप , संतोष हगवणे , संतोष बायस, गौरव जगताप, आनंद जंगम, सचिन शिंदे, मंगेश भिंताडे, ऋषिकेश चौधरी ,अनिकेत कामथे, कैलास केंजळे ,वासिम मणेर , अजय जगताप ,सचिन हंबीर, रघुनाथ बोरकर ,अभिजित भंडारी , विशाल बारभाई, अमित सागर ,विक्रम शिंदे , हर्षद इंदलकर , गोपीचंद मेमाणे ,मंगेश हगवणे ,अजिंक्य पवार , हेमंत सुकल ,आकाश जगताप , ईश्वर कदम ,अक्षय शिवरकर, राहुल थोपटे, प्रमोद जगताप, दीपक गावंडे, मनोज शिंदे, विक्रम फाळके, विकास झगडे, राहुल हगवणे, मदन ताकवले, अजय पठाण, रमेश शेरे, गौरव खाटपे, विलास कड, सचिन खैरे, धैर्यशील शिंदे, गिरीश झगडे उपस्थित होते.