निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर व पुरुषोतम महाराज पाटील यांच्या
कीर्तनावर वीस वर्ष बंदी घाला : दिव्यांग संघटनेचे अमोल बनकर यांची मागणी
सासवड दि.२३
दिव्यांग हक्क कायदा २०१६ अंतर्गत निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर पुरुषोतम महाराज पाटील यांच्या कीर्तनावर वीस वर्ष बंदी घालावी यासाठी माननीय दिव्यांग आयुक्त तथा न्यायदान अधिकारी साहेब यांच्या समोर दिव्यांग हक्क कायदा २०१६ प्रमाणे पुरुषोतम महाराज पाटील व निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्याविरोधात न्यायालयात अपंग विकास संघाचे अध्यक्ष अमोल बनकर यांनी दावा दाखल केला आहे
या दोन्ही कीर्तन कारांनी दिव्यांगांच्या भावना दुखावल्या असल्याने सदरील दावा दाखल केला असल्याचे बनकर यांनी म्हटलंय . पुरुषोतम महाराज पाटील व निवृत्ती महाराज इंदुरीकर देशमुख हे कीर्तनकार असून सबंध महाराष्ट्र मध्ये हे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत असतात परंतु पुरुषोतम महाराज पाटील व निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी दिव्यांगांच्या संदर्भात अनेक कीर्तना मधून दिव्यांगांच्या भावना दुःख होण्याच्या हेतूने दाखले दिले आहेत.त्याच बरोबर दिव्यान्गांच्या विषयी लोकांच्या मनामध्ये हीन भाव उत्पन्न होईल अशी वक्तव्य केली आहेत.
सध्या सोशल मीडियावर या दोघांचाही व्हिडीओ क्लिप व्हायरल होत असून यामधून पाटील यांनी या किर्तना दरम्यान जगातील आधळ्या-पागळ्या ला दया दाखवू नका. मागच्या जन्मात त्यांनी कोणते चांगले काम केले नाही. त्यामुळे त्याचे डोळे कान नाक हात पाय देवाने दिव्यांग बनवले आहेत त्यामुळे त्यांना कोणते प्रकारचे मदत करू नका अशा आशयाचे विधान केलेले आहे.
निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर दरम्यान युट्यूबवर त्याच्या कीर्तनाचे विडियो टाकणारांचे मुले दिव्यांग जन्माला येतील आशयाचे विधान केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशा आशयाचे अनेक कीर्तने इंदूरीकर यांनी सांगून समाजाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे या समाजामध्ये अपंगांच्या विषयीचे भावना बदलत असल्याचे दिसत आहे. यामुळे जगातील अपंगांच्यावर संपूर्ण समाजाकडून अन्याय होण्याची भीती सध्या संपूर्ण राज्यातील दिव्यांगांना वाटत आहे.
अमोल बनकर जेजुरी पोलीस
स्टेशन च्या अंतर्गत राहण्यासाठी असल्याने मला निवृत्ती महाराज देशमुख उर्फ
इंदूरीकर व पुरुषोत्तम पाटील यांच्यावर दिव्यांग हक्क कायद्यांतर्गत अजामीनपात्र
गुन्हा दाखल करण्यासाठी आपले आदेश मिळावेत. व हे आदेश पोलिस निरीक्षक जेजुरी पोलीस
स्टेशन यांना देखील देण्यात यावेत. यामुळे माझ्या सदरील केसी फौजदारी स्वरूपात
रूपांतर होऊन सासवड न्यायालय येथील चालेल. असे त्यांनी दाखल केलेल्या तक्रारी
अर्जात म्हटले आहे.