राणा दाम्पत्यावर राज्य सरकारन नक्की कोणत कलम लावले आहे ?
यात त्यांना किती शिक्षा होऊ शकते ?
अमरावतीच्या
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या विरोधात महाराष्ट्र
सरकारन गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटकही केली आहे. त्यांना आप न्यायालयीन
कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी याबाबात सावध भूमिका
घेतली तर काही पुढाऱ्यांनी अत्यंत उथळ प्रतिक्रिया दिल्या आहेत.काहींनी तर थेट
केंद्र सरकारचे गृह सचिवांची भेट घेतली आहे.अनेक हिंदी माध्यमांनी महाराष्ट्र सरकारने
केवळ हनुमान चालीसा म्हटल्यामुळे हा देशद्रोहाचा
दाखल केल्याच म्हटलं असून महाराष्ट्र सरकार हिंदू विरोधी असल्याच भासवण्याचा
प्रयत्नही केला आहे . पण काय आहे हे प्रकरण ? राणा दाम्पत्यावर नक्की कोणता गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. त्याला शिक्षा काय आहे ? किती आहे ? व तो अशा पकारे दाखल
करता येतो ? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मनसेचे राज ठाकरे
यांनी हिंदुत्वाचा नारा देत भोंग्यांचाविषय काढला आणि हे भोंगे ३ मे पर्यंत काढले नाहीत तर मशिदी पुढे स्पीकरवर हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा
केली. राज ठाकरेंच्या या घोषनेने राज्या मध्ये हे सरकार पडाव म्हणून गेली दोन वर्ष
देव पाण्यात ठेऊन बसलेले अनेक जनांना आयतेच कोलीत मिळाले.विविध धर्मात धार्मिक तेढ निर्माण करून सरकार अस्थिर करण्याचा
प्रयत्न यातून झाला. यापैकीच एक म्हणजे राणा पती पत्नी तस तर उद्धव ठाकरे आणि राणा पती पत्नी यांच्यात
यापूर्वी प्रत्यक्ष असा कोणताच वाद नाही.त्यांच्या मतदार संघाच्या विकास निधीवरून
काय वाद असता तर ठीक होत. पण
तस काही नाही.पण गेली काही दिवस राणा पती पत्नी उद्धव ठाकरे
यांच्यावर थेट हल्ला करताना पाहायला मिळत आहेत.
सरकारने राणा
दाम्पत्यावर कोणता गुन्हा दाखल केला आहे ?
सरकारने राणा पती पत्नी
यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. तस पाहिलं तर हा खूपच गंभीर गुन्हा
आहे. भारतीय दंड विधान कलम १२४ अ या नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नुसार राणा पती
पत्नीला कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त आजन्म कारावास व आर्थिक दंड अशी शिक्षा
होऊ शकते.
आता विरोधी पक्ष अस
म्हणतो आहे की, हनुमान चालीसा म्हटल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र असे
नाही. या कलमामध्ये असी कोणती तरतूद नाही की, धार्मिक प्रार्थना केल्यामुळे हा
गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र सरकार विरोधात राणा पती पत्नीने जी भूमिका घेतली आणि राज्यातील
सामाजिक जीवन व कायदा सुव्यवस्था बिघडवून
वैध मार्गाने स्थापन केलेले सरकार पडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.आणि म्हणूनच
त्यांच्यवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .हनुमान चालीसा म्हणणे किंवा धार्मिक
प्रार्थना करण्याचा अधिकार घटनेने प्रत्येकाला दिला आहे. पण आपल्या प्रार्थना पूजा
विधी दुसऱ्यावर लादण्याचा, त्यांच्या बद्द्तीनेच केली पाहिजे म्हणण्याचा व दुसऱ्याच्या
भावना दुखावण्याचा अधिकार कोणत्याही नागरिकाला नाही. राणा पती पत्नीची चूक इथेच झाली
आहे. त्यांनी जो अतिरेक केला,थेट सरकारला अव्हान केल आणि सरकार अस्थिर करून कायदा
सुव्यस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला त्याचाच हा परिणाम त्याच्यावर दाखल झालेला गुन्हा आहे.
कायदा काय म्हणतो ?
१२४ अ. देशद्रोह
: भारतात कायद्याद्वारे स्थापित झालेल्या सरकारविरोधात कोणीही, शब्दांनी, लिखित अथवा वाचिक, किंवा काही
चिन्हांनी अथवा दृश्य प्रातिनिधिकतेने, किंवा इतर
कोणत्याही माध्यमातून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल अथवा सरकारचा अवमान
करत असेल किंवा सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न अथवा असंतोष निर्माण
करत असेल, तर त्यास आजीवन कारावास, ज्यात आíथक दंडाचाही
समावेश असेल, किंवा तीन वर्षांचा कारावास व आíथक दंड किंवा आíथक दंड, ही शिक्षा केली
जावी.
याच प्रकारचा गुन्हा भाजप सरकारने जेएनयुचे विध्यर्थी असलेल्या कनैय्या कुमार याच्या विरोधातही दाखल केला होता.
त्यावेळीही हा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र हा कायदा ब्रिटीश
काळापासून चालत आला असून या कायद्या नुसार अनेक स्वातंत्र्य सैनिका विरोधात कारवाई ही
करण्यात आली आहे.