"मी अजूनही मनसेतच मी मनसे सोडल्याच्या बातम्या निव्वळ अफवा" -वसंत मोरे यांचा खुलासा
सासवड दि. ३०
पुणे शहरातील मनसे म्हटलं की सध्या एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे भोंग्यांवरून राज ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर त्याला प्रतीविधान केल्यानंतर पुणे मनसे शहराध्यक्षपदावरून वसंत मोरे यांना हटविण्यात आले व शशिकांत बाबर यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं यानंतर वसंत मोरे हे चर्चेत आले तसे वसंत मोरे हे पहिल्यापासून त्यांच्या विविध कामांतून त्यांच्या कार्यातून चर्चेत असतात एक आक्रमक नेता म्हणून वसंत मोरे यांची आगळी वेगळी ओळख आहे.
राज ठाकरे यांची १ मे ला औरंगाबाद येथे सभा आहे काल राज ठाकरे हे मुंबईहून पुण्यात आले आहे. पुण्यात राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसे पदाधिकारी उपस्थित होते त्या वेळी प्रकर्षाने वसंत मोरे हे अनुपस्थिती असल्याचं निदर्शनास आलं माध्यमांमध्येही आज त्यांच्या अनुपस्थिती बाबत "वसंत मोरे यांनी मनसे सोडली", "वसंत मोरे यांचा मनसेला रामराम" अशा आशयाच्या बातम्या झळकू लागल्या याबाबतीत चावडी न्युजने वसंत मोरे यांच्याशी संपर्क केला यावेळी त्यांनी सविस्तर खुलासा केला आहे ते म्हणाले ," मी मनसे सोडलेली नाही, या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत प्रसारमाध्यमातून चुकीच्या बातम्या लावल्या जात आहेत मी अजूनही मनसेतच आहे राज ठाकरे यांच्या स्वागताचा किंवा पुण्यातील राज ठाकरे यांचा स्वागत समारंभ हा पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम हा पूर्वनियोजित होता मात्र त्यांनी अचानक रात्री मला सांगितलं त्यामुळे माझा दुसऱ्या दिवशीचा सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेला होता यामुळे मला त्यामध्ये बदल करता येणे शक्य नव्हतं त्यांनी मला पुर्वकल्पना दिलेली नव्हती अचानक सांगितल्यामुळे मला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही मी पुण्यात जरी साहेबांच्या स्वागताला हजर नसलो तरी देखील औरंगाबादच्या सभेला मी जाणार आहे माझी काही वैयक्तिक काम आहे तीव्र उरकल्यानंतर मी औरंगाबादच्या सभेला उपस्थित राहणार आहे. आणि त्यासाठी मी औरंगाबादला जाणार आहे. जाणीवपूर्वक प्रसारमाध्यमांमधून ह्या बातम्या लावल्या जात आहे "
वसंत मोरे यांनी याबाबतीत चावडी न्युजशी बोलताना खुलासा केलेला आहे.
एकंदरीतच वसंत मोरे यांच्या अनुपस्थितीत बाबतीत प्रसारमाध्यमांमधून दिल्या जाणाऱ्या बातम्यांना त्यांनी अफवा ठरवले आहे आणि त्या बातम्या खोट्या असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.