सांगली मध्ये संभाजी भिडे सायकलवरून पडले. गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
सांगली दि.२७
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सांगली मध्ये अपघात झाल्याची माहिती समोर येते आहे. भिडे हे सायकलवरून जात असताना त्याच्या चक्कर आल्याने ते सायकलवरून पडले आणि त्यातून त्यांच्या गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांना सांगली येथील भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भिडे गुरुजी सांगलीतील गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी सायकलवरून जात होते. पण या दरम्यान त्यांना अचानक चक्कर आल्यामुळे सायकलवरून खाली पडले संभाजी भिडे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत भिडे यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्रात मोठा वर्ग आहे. संभाजी भिडे हे एकेकाळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होत. 1984 मध्ये त्यांनी शिवप्रतिष्ठानची स्थापना केली या नंतर ते शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करताना आढळून येतात. भिडे हे नेहमीच सायकलवरून प्रवास करत असतात. त्यांच्या सायकल प्रवासामुळे लोक त्यांच्याकडे कौतुकाने पाहत असतात. या अपघातात त्यांच्या ड खुब्याला दुखापत झाली आहे.