Type Here to Get Search Results !

राणा पती पत्नीने धार्मिक कार्यक्रम घरी करायला हवे होते : शरद पवार

 

राणा पती पत्नीने धार्मिक कार्यक्रम घरी करायला हवे होते : शरद पवार

मुखमंत्री हे संस्थात्मकपद आहे त्याची  गरिमा राखायला हवी.



  मुंबई दि.२५

    

             राणा पतीपत्नीने धार्मिक कार्यक्रम घरी करायला हवे होते. अस मत राष्ट्रवादीचे  अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय माध्यमांनी  विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. त्याच बरोबर ते म्हणाले कि, मुख्य्मंतीपद हे संस्थात्मकपद आहे. त्याचा मान सन्मान या लोकांनी राखायला  हवा.

         राज्यात मागील चार पाच दिवसात राणा पती पत्नीचा गोंधळ सुरु आहे. राज्य सरकार विरोधात  दोघांनी बोंब सुरु केली आहे. हनुमान चालीसा उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन  म्हणणार हा हट्ट त्यांनी धरला आहे. खरे तर ठाकरे कुटुंब हे पूर्वी पासूनच धार्मिक कुटुंब आहे.पूजाअर्चा  किंवा धार्मिक कुलधर्म कुलाचार करताना ठाकरे कुटुंबाला संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहे.शिवासेनेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार शिवसेनेनेच केला आहे. पण सत्तेवर आल्यावर कोणत्याही व्यक्तीला घटने नुसारच काम करावे लागते. सर्व धर्मांना बरोबर घेऊन त्यांच्यावर किंवा त्यांच्या हक्कावर कोणतीही गदा आणता येत नाही.पक्षाची ध्येय्य धोरणे काही असली तरी सत्तेच्या खुर्चीत बसलेल्या लोकांवर घटनेचा अंकुश असतो. त्यामुळे ठाकरे यांना सर्व धर्मीयांना बरोबर घेऊनच चालावे लागणार आहे. मात्र काही जातीयवादी किंवा सत्तालोलुप लोक आज  महाराष्ट्रातले धार्मिक वातावरण कलुषित करीत आहेत. हिंदू धर्माला कडवे स्वरूप आणून देशाची प्रतिमा मलीन करीत आहेत. त्यासाठी आपल्या धार्मिक देवतांचा व  स्तुती सुमनांचा गैरवापर करीत आहेत. हनुमान चालीसा राष्ट्रवादी शिवसेना व कॉंग्रेस मधील अनेक लोक म्हणतात. मात्र तीच हनुमान चालीसेच उपयोग  त्याच धर्मातील लोकांना डिवचण्यासाठी किंवा  चिडवण्यासाठी  केला जातो. तेव्हा त्याच धर्मात दोन गट निर्माण होतात  आणि त्या धर्माची एकता भंग पावते.आज नेमके तेच केले जात आहे. हाच प्रयोग यापूर्वी बंगाल मध्ये सुद्धा केला गेला आहे.तिथे आपल्याच धर्माच्या लोकांपुढे “जय श्री राम”च्या घोषणा देऊन त्यांना  डिवचले जात होते.जणू काही या देवाचा आणि घोषणेचा  ठेका यांनीच घेतला आहे.आज महाराष्ट्रातही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा प्रयोग केला जात आहे.हा प्रयोग काही दिवसांनी लोक विसरतील पण इतिहास मात्र हे लिहून नक्कीच ठेवेल.

.     राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  आज नेमके तेच सांगितले आहे. नवनीत राणा व रवी राणा यांनी  त्यांच्या घरात किंवा धार्मिक स्थळावर  कितीही वेळा हनुमान चालीसा म्हटली तर त्याला कोणाचीही हरकत असणार नाही.पण केवळ मनामध्ये आकस ठेऊन दुसऱ्याला डिवचण्याचा किंवा चीढवण्याचा त्यांना अधिकार नाही.यामुळे दुसऱ्याच्या धार्मिक भवनांना ठोस नक्कीच पोचते.या देशात धार्मिक स्वतंत्र घटनेने दिले आहे. पण आपला धर्म व त्यातील विधी आपल्या मर्जीनुसार दुसऱ्या लोकांवर लादण्याचा अधिकार मात्र कोणालाच नाही आणि शरद पवार यांनी  तेच अधोरेखित केले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies