कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा :उद्धव ठाकरे
मुंबई दि.२८
राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चौथी लाठ उंबरठ्यावरच रोखायची असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर लोकांनी स्वत: हून मास्क वापरणे महत्त्वाचे आहे त्याच बरोबर प्रत्येकाने लस घ्यायला हवी. असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणाले आहे. रुग्णांमध्ये फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळल्यास अशा लोकांनी तत्काळ कोटना टेस्ट करायला हवी. राज्यातील टेस्टिंगची संख्या तसेच लसीकरणाचा वेग वाढबावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
कोविड संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्याशी संवाद साधून कोविड स्थितीचा आढावा घेतला. बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह टास्कफोर्स चे अध्यक्ष डॉ संजय ओक, सदस्य शशांक जोशी डॉ राहुल पंडित यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चीनमध्ये ४० कोटी जनता सध्या लॉकडाऊन मध्ये आहे. आपणही कोविडच्या तीन लाटांचा यशस्वीपणे मुकाबला केला असला तरी आपल्या काही आप्तस्वकीयांना गमावले आहे, यासाठी लावलेल्या निर्बंधांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली, अनेकांचे रोजगार या काळात गेले. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कोविड अनकूल वर्तणूक अंगिकारणे आवश्यक आहे.