खंडोबाचीवाडीच्या सरपंचपदी अजित लकडे यांची निवड
सोमेश्वरनगर दि.२९
ग्रामपंचायत खंडोबाचीवाडीच्या सरपंचपदी अजित लकडे यांची निवड करण्यात आली आहे.मावळत्या सरपंच सरपंच भाग्यश्री धनंजय गरदडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त झाले होते.त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली
निवडणूक निर्णय अधिकारी प्रमिला लोखंडे यांनी आज दिनांक २९/४/२०/२२ रोजी सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता . सकाळी दहा वाजता सर्व सदस्यांची बैठक आयोजित करन्यात आली होती यामध्ये या अजित विलास लकडे यांना सरपंच करण्याचे ठरले त्यानुसार लकडे यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य , तलाठी दादासाहेब आगम , ग्रामसेवक सीमा गावडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना मदत केली.
यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन वसंतराव मदने , विद्यमान संचालक , लक्ष्मणराव गोफणे , अभिजित काकडे , जेष्ठ नागरिक नाना सोपना लकडे , भगवान नाना विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन बापुराव लकडे , बाबालाल काकडे सोसायटीचे संचालक प्रविण कोरडे , माजी सरपंच अंकुश लकडे , धनंजय गडदरे , भगवान लकडे , सतिश कटरे, विराज कोरडे, कल्याण लकडे, अमर पिंगळे, विक्रम सावंत, महेश मदने, तसेच गावातील जेष्ठ नागरिक, तरुण व महिलावर्ग यांनी सरपंचपदी निवड झालेले अजित विलास लकडे यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.