पुरंदर तालुक्यातील एस.टी.चे चालक गोरख शेलार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबीयांची परवड
आर्थिक मदतीचे आवाहन
गराडे दि.१२ ( वार्ताहर) पांगारे ( ता.पुरंदर) येथील रहिवासी एसटी मध्ये चालक म्हणून असणारे गोरख ज्ञानोबा शेलार ( वय ४९ वर्षे) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले एसटीच्या चालू असलेल्या संपामुळे आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे कुटुंबाची आर्थिक हेळसांड झालेली आहे शेलार कुटुंबास आर्थिक मदतीची गरज आहे समाजातील इच्छुक दानशूर व्यक्तींनी शेलार कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गुरव व संदिप जगताप यांनी केले आहे.
सविस्तर वृत्त असे की जेमतेम जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबातील शेलार हे 1996-97 साली चालक म्हणून ST सेवेत चालक म्हणुन दाखल झाले.2011 रोजी कामावर असताना अर्धांग वायू झाला. त्यामध्ये ते ऑफिस मध्ये शिपाई म्हणून काम करत होते. कुटुंबात आई ,पत्नी ,3 मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
तुटपुंज्या पगार घेऊन कुटुंब सांभाळून 3 मुलींना शिक्षण देऊन त्यांचे कसेबसे विवाह केले.आज रोजी मुलगा शिक्षण घेत आहे .डोक्यावर कर्जाचा डोंगर अश्या परिस्थिती मध्ये ST महामंडळ कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर पासून संप चालू केला आहे.आज रोजी खिशात 1 रुपया नाही .कुटुंब कसे चालवायचे हा तणाव सतत चेहेऱ्यावर होता.संप मिटला नाही तर काही खरं नाही असे मित्रांजवळ बोलत होते.
शुक्रवारी दि. 1 एप्रिल रोजी कामावर हजर होईल असे पत्र खात्याला देऊन दि. 6 एप्रिल पासून कामावर रुजू होणार होते. अशातच सोमवारी दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले.आज सगळं कुटुंब आई ,पत्नी, मुलगा उघड्यावर सोडून ते गेले.पुढची कुटुंबाची वाटचाल गंभीर झाली आहे .मुलाला कामावर घेऊन पत्नीला आर्थिक मदत करण्याचे आवाहन शेलार कुटुंब व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गुरव संदिप जगताप यांनी केले आहे.
संपर्कासाठी व आर्थिक मदतीसाठी गुगल पे मोबाईल नंबर -
संदिप जगताप- 9822153761