सासवड येथे दिवसा ढवळ्या सदनिका फोडून २८ लक्ष रुपयाच्या दागिन्यांची चोरी
सासवड दि.९
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे दिवसा ढवळ्या सदनिका फोडून २८ लक्ष रुपयाच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद सासवड पोलिसात देण्यात आली आहे.या प्रकरणी सासवड पोलिसांनी अज्ञात चोरट्याने विरोधात भारतीय दंड विधान कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सासवड येथील ज्ञानेश्वर लक्ष्मण सुभागडे,वय 62 यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.त्यानीं दिलेल्या फिर्यादी नुसार काल दिनांक 8 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 1.30 वाजलेच्या सुमारास ही घटना घडली आहे.यामध्ये त्यांच्या घरातील २८ लक्ष रुपयाचे दागिने चोरी झाले आहेत. अश्या प्रकारची फिर्याद त्यांनी दिली असून याबाबतचं अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप करीत आहेत.
गेलेल्या मालाचा तपशील
1) 3,60,000/- रुपये किंमतीचे 7.5 तोळे वजनाचे मणीमंगळसुत्र
2) 2,88,000/- रुपये किंमतीचा 6 तेळे वजनाचा राणीहार
3) 1,20,000/- रुपये किंमतीचा 2.5 तोळे वजनाचा नेकलेस
4) 2,88,000/- रुपये किंमतीचे 6 तोळे वजनाचे 2 तोडे
5) 1,20,000/- रुपये किंमतीची 2.5 तोळे वजनाची गरसोळी
6) 72,000/- रुपये किंमतीच्या 1.5 तोळे वजनाच्या वेडयाच्या तीन अंगठया प्रत्येकी
5 ग्रँम वजनाच्या
7) 1,00,000/- रुपये किंमतीच्या 2.1 तोळे वजनाच्या खडयाच्या तीन अंगठया,प्रत्येकी 7 ग्रँम
वजनाच्या
8) 48,000/- रुपये किंमतीची 1 तोळे वजनाची खडयाची अंगठी
9) 56,000/- रुपये किंमतीची 1.2 ग्रँम वजनाची डी.एल.सुभागडे लिहीलेली अंगठी
10) 36,000/- रुपये किंमतीच्या 8 ग्रँम वजनाच्या 2 लेडीज अंगठया,प्रत्येकी 4 ग्रँम वजनाच्या
11) 36,000/- रुपये किंमतीच्या 8 ग्रँम वजनाच्या लहान मुलांच्या 4 अंगठया,प्रत्येकी 2 ग्रँम
वजनाच्या
12) 12,000/- रुपये किंमतीचे 3 ग्रँम वजनाचे एक बदाम पान
13) 1,92,000/- रुपये किंमतीच्या 4 तोळे वजनाच्या दोन पाटल्या
14) 1,68,000/- रुपये किंमतीची 3.5 तोळे वजनाची एकदानी माळ
15) 1,92,000/- रुपये किंमतीचे 4 तोळे वजनाचे कानातले सहा जोड
16) 1,68,000/- रुपये किंमतीचा 3.5 तोळे वजनाचा गळयातील गोफ
17) 72,000/- रुपये किंमतीची 1.5 ग्रँम वजनाची मोठी चैन
18) 32,000/- रुपये किंमतीची 7 ग्रँम वजनाची डिझाईन चैन
19) 28,000/- रुपये किंमतीची 6 ग्रँम वजनाची लहान चैन
20) 72,000/- रुपये किंमतीचे 1.5 तोळे वजनाचे कानातील दोन जोड
21) 48,000/- रुपये किंमतीची 1 तोळे वजनाच्या दोन नाकातील नथ,प्रत्येकी 5 ग्रँम वजनाच्या
22) 36,000/- रुपये किंमतीचे 8 ग्रँम वजनाचे कानातील तुटलेले टॉपस
23) 6,500/- रुपये किंमतीचे 100 ग्रँम वजनाचे चांदीचे पैंजनाचे 2 जोड
24) 6,500/- रुपये किंमतीची चांदीची 100 ग्रँम वजनाची लक्ष्मीची मुर्ती
25) 3,000/- रुपये किंमतीचे चांदीचे 50 ग्रँम वजनाचे 4 लक्ष्मी कॉईन
26) 300/- रुपये किंमतीचे चांदीचे उदबत्तीचे घर
27) 3,00,000/- रुपये रोख रक्कम 500 रुपये व 200 रुपये दराच्या नोटा
------------------------------
एकुण – 28,60,300/-