कर्नलवाडी सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी अशोक निगडे यांच्या पॅनलच्या धुव्वा. दोन जागांवर मानावा लागले समाधान
नीरा दि.९
पुरंदर तालुक्याचे लक्ष लागुन राहिलेली कर्नलवाडी (ता.पुरंदर) येथील शरद विजय विविध कार्यकारी संस्थेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. संस्थापक व माजी सरपंच अशोक आबासाहेब निगडे यांच्या श्री. ज्योतीबा क्रुषी विकास पॅनेलचा त्यांचे चुलत बंधू ज्ञानदेव बुवासाहेब निगडे यांच्या ज्योतिर्लींग/जोतिबा गावकरी प्रगती पँनलने कडवे आव्हान देत १३ पैकी १० उमेदवार निवडून आले, तर २ श्री. ज्योतीबा क्रुषी विकास पॅनेलचे सदस्य.व एक सदस्य या आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
श्री. ज्योतीबा क्रुषी विकास पॅनेलचे प्रमुख अशोक निगडे हे २०५ मत मिळवत एकटेच निवडून आले, तर क्रुषी विकास पॅनेलच्या विमल बाळासाहेब निगडे व गावकरी प्रगती पँनलनच्या संगीत राजेंद्र निगडे यांना (१९६) समान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून विमल बाळासाहेब निगडे यांना विजय घोषित करण्यात आले. तर ज्योतिर्लींग/जोतिबा गावकरी प्रगती पँनलचे भानुदास पाटोळे या आधीच बिनविरोध निवडून आले होते.
कर्नलवाडी येथे दिवसभर मतदान शांतते झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता मतमोजणी झाली. सर्वसाधारण जागेसाठी ज्योतिर्लींग/जोतिबा गावकरी प्रगती पँनलचे ज्ञानदेव निगडे (२०९), श्रीकांत निगडे (२०९), बाळासाहेब निगडे (२१४), रणजित निगडे (२०७), प्रमोद निगडे (१९८), दिलीप निगडे (१९८), निलेश भोसले (१९४) तर ज्योतीबा क्रुषी विकास पॅनेलचे प्रमुख अशोक निगडे (२०५) निवडून आले आहेत. महिला प्रवर्गासाठी ज्योतिर्लींग/जोतिबा गावकरी प्रगती पँनलचे शुभांगी निगडे (२२४) व ज्योतीबा क्रुषी विकास पॅनेलच्या विमल निगडे (१९६) विजय झाल्या आहेत. इतर मागास प्रवर्गातून नरेंद्र रासकर (२२५), तर भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्गातून ज्योतीराम कर्णवर (२१०) विजय झाले आहेत.
पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडीच्या शरद विजय सोसायटीच्या निवडणूकीत ४८० सभासदांपैकी पैकी ४२५ सभासद मतदारांनी मतदानाच हक्क बजावला. दुपारी ०४ वाजेपर्यंत मतदान शांततेत पारपडले. ०५ वाजता मतमोजनी सुरु झाली. ती ०७ वाजता संपली. या अटी तटीच्या निवडणुकीत कर्नलवाडीचे सरपंच सुधिर निगडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयवंत कोंडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रुथ्विराज निगडे यांनी गावकरी प्रगती पँनलला निवडून आनण्यासाठी परिश्रम घेतले.
या निवडणूकीसाठी निवडणूक अधीकारी म्हणून सहकार खात्याचे सुनील जगताप होते. त्यांना पुरंदर तालुका सोसायटी सचिव संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. जेजुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी बनसोडे, जगताप यांंनी चोख बंदोबस्त ठेवला.