नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट २४ तास राहणार बंद,
पर्यायी मार्गाचा वापर करण्याची रेल्वे प्रशासनाची सूचना .
नीरा दि.२५
पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर असणाऱ्या पिंपरे खुर्द हद्दीत थोपटेवाडी येथे असणारे रेल्वे गेट बुधवारी दिवसभर वाहतुकी साठी २४ तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. या दरम्यान लोकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील पुणे- पंढरपूर महामार्गावर थोपटेवाडी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे. हे गेट रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी बुधवार दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी ६ ते गुरुवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी निरा- मोरगाव- जेजुरी या मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.