हसन शेख खून प्रकरणामधील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी गोविंद वाघमारे जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई
सासवड दि २८
पुरंदर तालुक्यातील कोडित गावच्या हद्दी मध्ये
हसन शेख यांचा खून करण्यात आला होता यानंतर या खुनातील आरोपी मागील तीन वर्षापासून फरार होता. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला २६/४)२०२२ रोजी जेरबंद केल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.
पुरंदर तालुक्यातील कोडीत येथे दिनांक २/२/२०१९ रोजी सकाळी १०:४० वाजण्याचे सुमारास पूर्ववैमनस्य व आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून आरोपी मंगेश कदम रा.कोल्हेवाडी ता.हवेली जि.पुणे त्यांचे इतर 14 ते 15 सहकार्य यांनी मिळून हसन शेख रा.धायरीगाव यांचा गावठी काट्यातुन फायरिंग व धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. याबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे येथे भारतीय दंड विधान कलम ३०२ तसेच आर्म अॅक्ट ३ चा २५ व ४ चा २६ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे सदर गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस यांनी तत्काळ अटक केली होती,परंतु या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मंगेश शिवाजी कदम व त्यांचा साथीदार गोविद गजेंद्र वाघमारे हे गुन्हा केल्यापासून फरार होते ते नेहमी आपली नावे व राहण्याची जागा बदलून राहत आल्यामुळे त्यांना अटक करण्याचे आवाहन पोलीस समोर होते व सदरची घटना ही गंभीर स्वरुपाची व वर्चस्व वादातून झाली असल्याने सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 कलम 3 चे १,२ व ४ हे कलम लावण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सातत्याने या गुन्ह्याचा तपास करीत होते त्याप्रमाणे
दिनांक २६/४/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक हवेली पोलीस स्टेशन हद्दीत आरोपीचा शोध घेत असताना पोलीस नाईक अमोल शेडगे यांना गोपनीय बतमीदाराकडून माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील एक आरोपी गोविद गजेंद्र वाघमारे हा कोल्हेवाडी ता.हवेली येथे येणार आहे त्या प्रमाणे सदर ठिकाणी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले.पुढील कारवाईसाठी त्याला सासवड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे
सदरची कारवाई ही सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते , उपधिक्षक भोर धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके,उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,पोलीस नाईक अमोल शेडगे,पोलीस नाईक बाळासाहेब खडके, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव,महीला पोलीस कॉन्स्टेबल पूनम गुंड यांनी केली..