राज्यांमुळे इंधनाच्या दरात वाढ नाही : पंतप्रधान मोदींच्या वक्तव्य नंतर उद्धव ठाकरे यांचे चोख उत्तर
मुंबई दि.२७
राज्य सरकारने लावलेल्या करामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होत. लोकांच्या कल्याणासाठी
इंधनावरील वेट कमी करा अस त्यांनी म्हटलं होत मात्र यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी राज्य व केंद्रीय कराची आकडेवारी जाहीर केलीय.त्याच बरोबर केंद्राला सर्वात जास्त कर महाराष्ट्र देत.पा त्या प्रमाणात केंद्राकडून राज्याला वाटा मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
दररोजच्या इंधन दर दरवाढीच्या मुद्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आता आमने-सामने येताना दिसत आहे. तर उद्धव ठाकरेंकडून इंधन दरवाढ संदर्भातील पंतप्रधानाच्या मुद्द्यावर उत्तर देण्यात आले आहे.केंद्राकडून निधी वाटप करताना महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. सर्वात जास्त कर महाराष्ट्र राज्य केंद्र देते.मात्र केंद्राकडून वारंवार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देण्यात येते असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केलेला आहे. महाराष्ट्राचे २६ हजार कोटी रुपये केंद्राकडे अजूनही येणे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्राला केंद्रेकरांच्या करातून ५.५ टक्के रक्कम मिळते एकूण थेट करा मध्ये महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के असून हा संपूर्ण देशात सर्वात जास्त आहे. देशातील एकूण जीएसटी पैकी पंधरा टक्के जीएसटी एकट्या महाराष्ट्रातून गोळा होतो आणि दोन्ही एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असूनही आजही राज्यात सुमारे २६हजार ५०० कोटी रुपयांची थकबाकी मिळणे बाकी आहे. आज मुंबईत एक लिटर डिझेल या दरांमध्ये २४ रुपये ३० पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे वाटा केंद्राचा तर ३२ रुपये ५५ पैसे वाटा राज्याचा आहे. त्यामुळे राज्यांमध्ये इंधन दरवाढ होते ही वस्तुस्थिती नसल्याचं ठाकरे यांनी म्हटल आहे.अशा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पांत्रप्रधनाच्या वक्तव्याला चोख उत्तर दिले आहे.