उत्कृष्ठ समाजकार्यासाठी " कै.दिनकरराव सावंत स्मृति प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहिर.
जेजुरी प्रतिनिधी _ दि.१४
सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजावलेल्या संस्था , व व्यक्ती यांना गेली पंचवीस वर्षापासून "कै. दिनकरराव सावंत स्मृति प्रतिष्ठानच्या " वतीने पुरस्कार दिले जातात.
पुरंदर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व निरा येथील पत्रकार श्री राहुलजी शिंदे यांनी आपल्या परिकारितेतून विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे. त्यांना " आदर्श पत्रकारिता " तसेच पिंपरी _चिंचवड देवस्थानचे विश्वस्त व ह. भ. प. श्री आनंद तांबे यांनी आपल्या किर्तनातून बऱ्याच वर्षापासून समाजप्रबोधनाचे कार्य करीत असल्याने त्यांना " समाजभूषण " यंदा यां दोघांना प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार जाहिर झालेले असून त्या पुरस्काराचा वितरण समारंभ पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार संजयजी जगताप यांच्या हस्ते होणार आहे.
पुरस्कार वितरणावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संजयजी सावंत, सदस्य , विश्वस्त व माजी नगरसेवक रविंद्र जोशी ,सदस्य, सुमित काकडे,व सदस्य, पत्रकार नितीनजी राऊत हेही उपस्थित राहाणार आहेत. अशी माहिती जेजुरीतील राजमाता जिजाबाई हायस्कूल व कॉलेजचे प्राचार्य श्री नंदकुमार सागरसर यांनी आमच्या प्रतिनिधीला कळवले आहे.