Type Here to Get Search Results !

राज्यातील नगरपालिका महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकीचा बार दिवाळीचे लाडू खाऊनच उडणार:

 राज्यातील नगरपालिका महापालिका आणि  जिल्हापरिषद निवडणुकीचा बार दिवाळीचे लाडू खाऊनच उडणार:



 निवडणूक आयोगाच्या सचिवांची माहिती


मुंबई.


          राज्यांमधील मुदत संपलेल्या वीस महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायत समितीचे निवडणुकांची रणधुमाळी ही दिवाळीचे लाडू खाल्ले नंतरच होणार हे आता  स्पष्ट झाले आहे. या निवडणुका जून-जुलैमध्ये घेण्यास निवडणूक आयोग तयार नसल्याचं  स्पष्ट झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुका लवकरच  होतील याचा अंदाज व्यक्त केला होता.


    मात्र या अडचणी असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाकडून सादर करण्यात आले असल्याचे  सचिव किरण कुरुंदकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. कोल्हापूर मध्ये 23 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद मेळाव्याची सांगता झाली. त्यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणाची सुनावणी २५ तारखेला होईल. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यास  राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागतील.  तेव्हा तुम्ही तयारी निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना दिला होता. परंतु २५ एप्रिल रोजी सुनावणी न होता  ती आता ४  मे रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आणि या निवडणुका या कालावधीत घेण्यात अडचणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 


        एवढ्या सगळ्या निवडणुका रका  टप्प्यात घेणे शक्य नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या निवडणुका दिवाळी नंतरच  होतील असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ४ मे रोजी सुनावणी झाली तरी निवडणुका होण्याची शक्यता नाही. जून-जुलै किंवा पावसाळ्यापूर्वी या निवडणुका होण्याची शक्यता नाही. दिवाळीनंतर या निवडणुकांचा होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपचे  कुस्ती दिवाळीचे लाडू खाल्ले नंतरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies