सुनिता कसबे यांचा भाजपला रामराम
सासवड दि.२८
भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य मीडिया सदस्या सुनिता कसबे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून याबाबत ची माहिती त्यांनी आज दिनांक २८ एप्रिल रोजी माध्यमांना दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे राहणाऱ्या सुनिता कसबे यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राज्य मीडिया सदस्य पदी दिनांक २१/५/२०१९ रोजी निवड करण्यात आली होती. गेली तीन वर्ष त्या या पदावर काम करीत होत्या. कसबे या आता पत्रकारिता करीत असल्याने त्यांच्या कामात अढथळा येऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.