जिमाच्यावतीने धनंजय भोईटे यांचा जेजुरीत येथे करण्यात आला सत्कार
जेजुरी दि.४
पुरंदर तालुक्यातलं जेजुरी एमआयडीसी येथे आज (दि. ४ एप्रिल) रोजी सासवड बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष धनंजय भोईटे यांची पुरंदर तालुका बारअसोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रचंड बहुमताने निवड झाल्या तबद्दल जेजुरी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात जिमाच्या व के,बी.सी. स्पोर्ट क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिमा अध्यक्ष डॉ. रामदास कुटे म्हणाले की, धनंजय भोईटे यांनी सामाजिक क्षेत्रातील बरीच पदे भूषविली आहेत. कोथळे ग्रामपंचायतीचे ते अनेक वर्षे सदस्य आहेत. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक आहेत
मार्तंड देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्थ म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. आम्हा सर्व जिमा सभासदांना त्यांचा अभिमान आहे.
यावेळी जिमाचे उपाध्यक्ष पांडुरंग सोनावणे, कार्याध्यक्ष रवींद्र जोशी, सचिव राजेश पाटील, खजिनदार अनंत देशमुख, व्यवस्थापक श्री जालिंदर कुंभार, जिमा सदस्य संभाजी जाधव, शमहामिने , जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गावडे इत्यादी उपस्थित होते.