श्री.शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महामानावाचा १३१ वा
भीमजन्मसोहळा विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाने साजरा
नीरा दि.१४
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गुणगौरव म्हणून शाळेच्या
फलकावर सुंदर अशा हस्ताक्षरात महामानवाला अभिवादन करण्यात आले त्यानंतर
पुरंदर तालुक्यातील नावळी येथील श्री.शिवाजी
इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३१ वा जन्मसोहळा विविध सामाजिक आणि शैक्षणिक
उपक्रमाने साजरा. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
प्रतीनेचे पूजन करण्यात आले.त्याच बरोबर संविधान पुस्तीकेचे वाटप करण्यात आले.
आधुनिक भारताचे
जनक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती
सोहळ्या निमित्ताने श्री शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये,नावळीचे उपसरपंच मोहन
सोनवणे तसेच पुरंदर तालुका RPI चे अध्यक्ष गौतम भालेराव यांच्यावतीने श्री
शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महामानावाचा 1१३१ वा भीमजन्मसोहळा विविध
सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाने साजरा.
प्रसंगी संस्थेचे सचिव आणि मुख्याध्यापक श्रीकांत पवारांनी बाबासाहेबांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य विध्यार्थ्यांना सांगितले. आशिया खंडातील पहिली अर्थशास्त्र विषयात PHD करणारे तसेच २७ विषयांत MA करणारे महान शिक्षण तज्ञ ,कायदेतज्ञ, कायदामंत्री म्हणून त्यांची ख्याती संपूर्ण भारतभर आहे.... कामगार मंत्री असताना त्यांनी कामगारांचे कामाचे तास १४ तासांवरून ८ तासांवर आणले ,उपेक्षित आणि वंचित घटकाला मूळ प्रवाहात आणून त्यांचे सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचावले. तसेच त्यांच्या भाषणात त्यांनी आवर्जून सांगितले. या महाराष्ट्र भूमीत दोनच राजे होऊन गेले. एक त्या रायगडावर आणि दुसरे चवदार तळ्यावर. नावळी गावच्या उपसरपंचांनी आपल्या भाषणात म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान बनवताना कोणतीच अडचण आली नाही. कारण त्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचा आदर्श आदर्श होता. कार्यक्रमाचा समारोप संविधानाची उद्देश पत्रिका वाचून झाला
या कार्यक्रमासाठी नावळी गावचे ग्रामसेवक सुनील माने, विश्वकोमल सोनवणे, राखगावचे उद्योजक संतोष रणवरे, संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रदीप पवार,तसेच बहुसंख्येने महिला पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या समनव्यक सतीश चव्हाण, रणजीत पवार, प्रियंका पवार,उपशिक्षिका मनीषा पवार, सुप्रिया म्हस्के, प्रतीक्षा खलाटे, शुभदा पवार आदींनी केले सूत्रसंचालन आणि आभार संस्थेचे सचिव श्रीकांत पवार यांनी मानले.