पालखी मार्गावरील पिसूर्टी रेल्वेगेट जैसेथे ठेवल्याने प्रवाशांसह वारकऱ्यांमध्ये नाराजी
पालखी मार्गावरील पिसूर्टी रेल्वे क्रॉसिंगला उड्डापूलाची गरज
नीरा : दि.२८
देशभरातील रेल्वे मार्ग फाटक मुक्त करण्याचा मानस रेल्वे मंत्रालयाचा असुन ; पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे - मिरज रेल्वे लाईनवरुन जणऱ्या प्रत्येक रस्त्यावरील फाकट हटवून रेल्वे खात्याने भुयारी मार्ग काढुन दिलेत आहेत . पण अत्यंत रहदारीच्या पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा - वाल्हे दरम्यानचे पिसूर्टी हद्दीतील रेल्वे फाकट क्रमांक २७ बाबत जैसेथे परिस्थिती रेल्वे विभागाने ठेवल्याने प्रवाशांनसह पायीवारी करणाऱ्यां वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ब्रिटिश काळात मिटर गेज व स्वातंत्र्यानंतर ब्रॉडगेज रेल्वे या मार्गावरून धावू लागली. गेली सत्तर वर्षे ही रेल्वे एकाच ट्रँकवरुन धावत आहे. मागील पाच वर्षे पुणे - मिरज दरम्यान रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण सुरु झाले. तसेच विद्युतीकरण ही शेवटच्या टप्यात आहे. मे महिण्याच्या पहिल्या आठवड्यात प्रायोगिक तत्वावर काही गाड्यांना इलेक्ट्रिक इंजिन जोडले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशी गाड्यांसह मालगाड्यांचा आता वेग वाढणार आहे. अशा वेळी रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला पालखी मार्गावरिल पिसूर्टी रेल्वे गेटवर प्रवाशांचे हाल होणार असल्याची भिती व्यक्त होत आहे.
जेजुरी औद्योगिक वसाहत ते नीरा या दरम्यानच्या अरुंद व अशास्त्रीय मार्गवर दररोज एकतरी छोटा मोठा अपघात होतच असतो. त्यातच पिसूर्टी रेल्वे गेट हे सुद्धा अपघात प्रवण क्षेत्रच आहे. पालखी मार्ग व रेल्वे रुळ हे काटकोनात नसुन त्या भाग तिरका असल्याने वेगात आलेली दुचाकी हमखस घसरते, तर चारचाकी चालकांची ही कसरत होत असते. रेल्वे फाकट लागल्यावर ऊस वाहतूक करणारे भरगच्च भरलेले ट्रक, ट्रँक्टर ट्रॉलीमुळे या परिसरात मोठ्या रांगा लागतात.
जेजुरी बाजूने येताना पिसूर्टी गावच्या स्वागतकमानी पासुन पालखी मार्गावर मोठा चढ व रस्ता अत्यंत अरुंद आहे. साइडपट्टया खचल्या आहेत. त्यामुळे एका वेळी दोन मोठी वाहने सहज या रस्त्यावरून न जाता एकातीर वाहनचालकाला आपल्या गाडीचे डाव्याबाजूचे चाक डांबरी रस्त्यावरुन उतरवावे लागते. अशा वेळी वाहनांचे नुकसान तर होतेच पण अपघाताची ही भिती निर्माण होत असते. या धोकेदायक रस्त्यामुळे कितेक प्रवाशांना मृत्यूला सामोरे जावे लागले.तर कितेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.
गेली दोन वर्षे कोव्हिडमुळे पायी पालखी सोहळा झाला नव्हता. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी झाली नाही. दर वर्षी आषढी पालखी सोहळ्यापुर्वी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकरी, प्रांत, तहसीलदार, पोलीस अधिकारी, बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी या मार्गाचे सर्वेक्षण करतात. पालखी सोहळ्या पुरतेच या रस्त्याची डागडुजी व रंगरंगोटी केली जाते. त्यानंतर किती अपघात या मार्गावर झाले तरी कोणताच बदल गेली तीस वर्षांत झाल्याचे पहावयास मिळाला नसल्याचे स्थानीक ग्रामस्थ सांगतात.
"नुक्तेच आळंदी देवस्थान व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखंनी सासवड ते पंढरपूर पालखी मार्गाचे सर्वेक्षण केले. मार्गवर, पालखीतळांवर व रिंगणांच्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणा बाबत तक्रारी करण्यात आल्या. मात्र सोहळा प्रमुखंना जेजुरी औद्योगिक वसाहत ते नीरा या दरम्यानच्या अरुंद रस्त्याबाबत काही अडचण असल्याचे बोलल्याचे ऐकीवात नाही, हे नवलच वाटते."
अंकुश मुर्लिधर जगताप, मांडकी
"गेली आठ वर्षांपूर्वी पालखी मार्गावरील गोरगरिबांची अतिक्रमणे नोटीस न देता पोलीसी खाक्या दाखवून काढली. त्यानंतर लगेच या रस्त्याचे रुंदिकरण होईल असे लोकांना वाटले पण जेजुरी ते नीरा पालखी मार्गाचे एक इंचही रुंदिकरण झाले नाही. पुढील काळात प्राहार पक्षाच्यावतीने या धोकेदायक रस्त्याच्या रुंदिकरणा बाबत आंदोलनाच्या भुमिकेत आम्ही आहोत."
मंगेश ढमाळ, प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष