Type Here to Get Search Results !

राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव; पहिला रुग्ण आढळला

 

राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव; पहिला रुग्ण आढळला

 


मुंबई/:

     कोरोणाचा नवाव्हेरीयंट एक्सई बाबत जागतिक आरोग्य संघटनेने आधीच सतर्क केले असताना भारतात या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला आहे. मुंबईत एक्सई  तसेच कप्पा व्हेरिएंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या बातमीने मुंबई , महाराष्ट्र आणि देशाचीही चिंता वाढली आहे.

                     कोरोनाची तिसरी  लाट ओसरली असतानाच भारतात नव्या व्हरिएंटने शिरकाव केल्याने डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे. मुंबईत एक्सई आणि कप्पा व्हेरिएंटचा एकेक रुग्ण आढळला आहे. देशातील एक्सई व्हेरिएंटचा हा पहिलाच रुग्ण ठरला आहे. विषाणूची जनुकीय चाचणी कर्ली असता हे रुग्ण आढळले आहेत. जनुकीय चाचणीसाठी ३७६ नमुने घेण्यात आले होते. त्यातील २३० नमुने मुंबईतून घेतले गेले होते. या चाचणीची ही अकरावी खेप होती. यात २३० पैकी २२८ नमुन्यांत ओमिक्रॉनची लक्षणे, एकात कप्पा व्हेरिएंटची लक्षणे तर एकात एक्सई व्हेरिएंटची लक्षणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाचा एक्सई हा नवा व्हेरिएंट ओमिक्रोनाचा नवा व्हेरीयंट  बीए.२ च्या तुलनेत १० टक्के जास्त वेगाने फैलावतो, असे प्राथमिक अभ्यासात आढळले आहे. ब्रिटनमध्ये या व्हेरिएंटचे आतापर्यंत सहाशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. पहिला रुग्ण १९ जानेवारी रोजी आढळला होता. जागतिक आरोग्य संघटनेनेच या व्हेरिएंटला एक्सई हे नाव दिले असून त्याबाबत काही दिवसांपूर्वीच सावधही केलेले आहे. एक्सई हा ओमिक्रॉनचे सब व्हेरिएंट बीए.१ आणि बीए.२ याचा रिकॉम्बिनेंट स्ट्रेन आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies