सासवड येथे पत्रकार व पोलीस यांच्यावतीने मुस्लीम बांधवांसाठी इप्तार पार्टीचे आयोजन
सासवड दि.२९
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आज दिनांक २९ एप्रिल रोजी इप्तार पार्टीचे
आयोजन करण्यात आले होते.
मुस्लीम बांधवांचे सध्या रोजे सुरु आहेत. अनेक मुस्लीम बांधव या
महिन्यात रोजे पाळत असतात्त सायंकाळी हे रोजे सोडले जातात.
सासवड पोलीस स्टेशन
व सासवड शहर पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी इप्तार परतीचे आयोजन करण्यात येते.
त्या प्रमाणे आज या पार्टीचे आयोजन
करण्यात आले होते. यावेळी सासवड शहरतील सर्व
मुस्लिम बांधवाना पत्रकार संघाच्यावतीने
तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने रमाजनच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी पत्रकार हेमंत ताकवले, श्रीकृष्ण नेवसे, बाळसाहेब कुलकर्णी,
वामन जगताप, आरोग्य आधिकारी मोहन चव्हाण, तसेच मुस्लिम समाज
चे आरीफ आतार, हासन तांबोळी, आकबर ईनामदार,
समस्त मुस्लिम समाज उपस्तीत होता.