Type Here to Get Search Results !

गुळुंचे येथील भैरवनाथ सोसायटीच्या स्विकृत संचालकपदी नितीन निगडे व लालासाहेब निगडे.

गुळुंचे येथील भैरवनाथ सोसायटीच्या स्विकृत संचालकपदी नितीन निगडे व लालासाहेब निगडे.


नीरा दि.३०

गुळुंचे (ता.पुरंदर) येथील भैरवनाथ वि.कार्यकारी सोसायटीच्या स्वीकृत  संचालकपदी नितीन बबन निगडे व लालासाहेब निगडे यांची निवड करण्यात आली आहे .आज (दि.३०) रोजी नीरा येथील सोसायटी कार्यालयात झालेल्या सभेत चेअरमन मल्हारी निगडे यांनी या निवडीची घोषणा केली. सर्व संचालकांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिंनदन केले. निवडीनंतर सोसायटी कार्यालयासमोर फटाके वजवून गुलालाची उधळण करण्यात आली.


  नितीन  निगडे व लालासाहेब निगडे हे आमदार संजय जगताप यांचे खंदे समर्थक,मानले जातात. या  निवडी नंतर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य कांचन निगडे, उत्तम निगडे, राजेंद्र निगडे, सोमनाथ खोमणे, विलास निगडे, बँक अधिकारी भुजबळ साहेब, यांनी त्याचा  पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी संस्थेचे  चेअरमन मल्हारराव निगडे, नितीन गायकवाड,मा चेअरमन जगदीश निगडे, चालक भानुदास निगडे, जेष्ठ नेतृत्व संचालक हरीकाका निगडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies