सासवड येथे मोटर सायकल कारचा अपघात एक मुलगी गंभीर जखमी
सासवड दि.१६
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे काल दिनांक २५ एप्रिल.रोजी बेकदरपणे वाहन चालवून अपघात केल्या प्रकरणी एका कार चालकाच्या विरोधात फिर्याद देण्यात आली आहे.या संदर्भात पोलिसांनी कार चालकाच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 279, 337, 338, 427, व मोटार वाहन कायदा कलम184 नुसार गुन्हा दखल केला आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यासंदर्भात सासवड येथे राहणारे दिपक शिवाजी गार्डी यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक २५ एप्रिल रोजी ते स्पेंल्न्डर मोटारसायकल नं MH12FN1772 वरुन त्यांचे मुलांसह कन्हैया चौक सासवड मार्गे पारगावकडे जात असताना जेजुरी नाका चौकात पुणे बाजुकडुन येणारी मारुती ईको कार नं MH12LP8827 हीने त्यांच्या मोटारसायकलीस भरधाव वेगात येवुन जोरात ठोस देवुन अपघात केला. अपघातात त्यांच्या मुलीच्या उजव्या पायाचे नडगीचे हाड फ्रँक्चर करुन गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्या मोटार सायकलला अपघात करून मुलीच्या दुखापतीस कारणीभुत झाल्या प्रकरणी त्यांनी त्यांनी मारुती ईको कार नं MH12LP8827 वरील चालकाविरुध्द फिर्याद दिली आहे. या बाबतचा अधिकचा तपास सासवड पोलीस करीत आहेत.