चांबळी येथे जमिनीसाठी एका कुटुंबाला मारहाण सासवड पोलिसात फिर्याद दाखल
सासवड दि.५
पुरंदर तालुक्यातील चंबळ येथे जमीन विकावी या कारणावरून एका कुठुंबाला मारहाण करण्यात आली आहे.याबाबत सासवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३२४,४४७,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,याबाबतची फिर्याद चांबळी येथील शहाजी बळवंत कामठे यांनी दिली आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक ४/४/२०२२ रोजी ते त्यांच्या शेतात गेले असताना आरोपी रघुनाथ महादेव कामठे ,आनंता गोपाळ कामठे,गौरव रघुनाथ कामठे ,बाळु रघुनाथ कामठे , वैशाली रघुनाथ कामठे , छाया आनंता कामठे सर्व रा चांबळी यांनी तुझी जमीन आमच्या घरा शेजारी आहे. ती आम्हाला विक असे म्हणून मारहाण केली. यामध्ये त्यांची पत्नी मुलगा व पुतण्यालही मारहाण करण्यात आली. याबाबतचा अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार
गार्डी करीत आहेत.